Aurangabad: गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी वाजवण्यावर बंदी; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून 144 चे आदेश
Ganesh Chaturthi 2022: औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत आदेश काढले असून, डीजे-डॉल्बीचे वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
Ganesh Chaturthi : गणेशोत्सवात आणि बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बी (Dj Dolby) वाजवण्यावर न्यायालयाने घातलेली बंदीचा उल्लेख करत, औरंगाबाद प्रशासनाने डीजे-डॉल्बीचे मालक यांच्यावर कलम 144 नुसार बंदी घालण्याचे आदेश काढले आहेत. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत आदेश काढले असून, डीजे-डॉल्बीचे वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात 31 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा (Ganesh Chaturthi 2022) होणार आहे. त्यामुळे आगमन व विसर्जन मिरवणुकप्रसंगी विविध गणेश मंडळ डीजे-डॉल्बी लावण्याची शक्यता आहे. तर डीजे-डॉल्बी लावण्यावरून मंडळाचे पदाधिकारी विविध संघटना यांचे नेते व कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासनात अनेकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही बंदी करण्यात आली असल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.
डीजे-डॉल्बी सिलबंद
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात कलेल्या उल्लेखानुसार औरंगाबाद जिल्हयातील डीजे-डॉल्बी मालक आणि धारक यांचेकडे असलेले डीजे सिस्टीम उत्सव कालावधीत रोखुन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डीजे-डॉल्बी सिस्टीम कब्जा असलेल्या ठिकाणच्या जागेवरच सिलबंद प्रतिबंध करणेकरीता आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे डीजे-डॉल्बी मालक आणि धारक यांना फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 नुसार बंदी घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.
अन्यथा कारवाई...
मोठया आवाजाचे कंपनामुळे लहान मुले, वयोवृध्द नागरिकांच्या कानास आणि हृदयास धोका होवून त्यांच्या आरोग्यास आणि जिवितास धोका होवू शकतो.तसेच शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश आगमन ते विसर्जनाच्या काळात डीजे-डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास बंदी असणार आहे. तसेच डीजे-डॉल्बी सिस्टीम वाहने मालक आणि धारक यांनी त्यांच्या स्वतःच्या जागेत डीजे-डॉल्बी सिस्टीम उभी करून ठेवणे आवश्यक राहणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: बाप्पाच्या आगमनासाठी औरंगाबादकर सज्ज; तर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त
Ganesh Utsav 2022 : मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करा; मंडळांना केलं हे आवाहन