एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg: औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात, भरावे लागणार एवढा टोल

Maharashtra Samruddhi Mahamarg: औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील (Jalna District) साई भक्तांचा प्रवास आता कमी वेळेत आणि सुखकर होणार आहे.

Maharashtra Samruddhi Mahamarg: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 10 जिल्ह्यातील 26 तालुके आणि 391 गावातून जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील विकासात आणखी एक भर पडणार असून, प्रवास सुखकर होणार आहे. दरम्यान याचा फायदा औरंगाबाद ते शिर्डी (Aurangabad To Shirdi) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील होणार आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे आता औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील (Jalna District) साई भक्तांचा प्रवास आता कमी वेळेत आणि सुखकर होणार आहे. 

समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी (Nagpur TO Shirdi) हा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीस खुला केला जाणार आहे. त्यामुळे औरंगाबादहून शिर्डी जाण्यासाठी वैजापूर व श्रीरामपूरमार्गे आदळ- आपट करीत चार तासांत शिर्डीत जाण्याच्या जाचातून भाविकांची सुटका होणार आहे.  औरंगाबादच्या सावंगी इंटरचेंजपासून अवघ्या चाळीस मिनिटांत शिर्डी गाठणे शक्य होणार आहे. ज्यासाठी प्रवाशांना 170 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. 

असा होणार बदला... 

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या सहापदरी 520  कि.मी.च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात होणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात हर्सूल सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव (लासूर स्टेशन) आणि जांबरगाव (वैजापूर) या ठिकाणी समृद्धी महामार्गावर इंटरचेंज असणार आहे. तर औरंगाबाद, जालना या दोन्ही जिल्ह्यातून दररोज शेकडो साईभक्त दर्शनासाठी शिर्डीला जात असतात. सध्या जालना मार्गाने शिर्डीचे अंतर सुमारे 190  कि.मी. असून, यासाठी  औरंगाबादहून श्रीरामपूर व वैजापूरमार्गे शिर्डीस जावा लागते. शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबाद-वैजापूर- शिर्डी असा प्रवास करण्यासाठी सद्या चार तास लागतात. त्यात रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहनधारक हा मार्ग टाळण्याचे प्रयत्न करतात. तर दुसरीकडे औरंगाबादहून नेवासा, श्रीरामपूरमार्गे शिर्डीस जाण्यास साडेतीन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. 

असा असणार टोल... 

समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रति कि.मी. 1 रुपये 73 पैसे या दराने टोल आकारला जाणार आहे. त्यामुळे औरंगाबाद ते शिर्डी हे अंतर 99  कि.मी. असून, शिर्डीला जाण्यासाठी 171 रुपये टोल द्यावा लागणार आहे. तसेच नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी 900 रुपये आणि औरंगाबाद ते नागपूर या प्रवासासाठी 700 रुपयांपेक्षा जास्त टोल भरावा लागणार आहे. 

Samruddhi Mahamarg: मोदींच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Sai Baba Idols:'साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही'; वाराणसीच्या 14 मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती गंगेत विसर्जित
वाराणसीच्या मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, साईबाबा हिंदू नव्हे मुस्लीम असल्याचा दावा
2 महिन्यात 48 लाख नवरदेव बोहल्यावर चढणार,  6 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार, शुभ मुर्हत कधीपासून?
2 महिन्यात 48 लाख नवरदेव बोहल्यावर चढणार,  6 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार, शुभ मुर्हत कधीपासून?
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 AM : 02 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM  : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 02 Oct 2024 Marathi NewsMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6:30  AM :  2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Sai Baba Idols:'साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही'; वाराणसीच्या 14 मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती गंगेत विसर्जित
वाराणसीच्या मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, साईबाबा हिंदू नव्हे मुस्लीम असल्याचा दावा
2 महिन्यात 48 लाख नवरदेव बोहल्यावर चढणार,  6 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार, शुभ मुर्हत कधीपासून?
2 महिन्यात 48 लाख नवरदेव बोहल्यावर चढणार,  6 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार, शुभ मुर्हत कधीपासून?
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
Horoscope Today 02 October 2024 : आज सर्वपित्री अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्वपित्री अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
तुम्हाला माहितीय? स्वर्गाचा रस्ता भारतातून जातो... कुठून? स्वतःच जाणून घ्या!
तुम्हाला माहितीय? स्वर्गाचा रस्ता भारतातून जातो... कुठून? स्वतःच जाणून घ्या!
Bigg Boss 18: एकीकडे रिअल लाईफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, त्यात बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार भाईजानची हिरोईन?
एकीकडे रिअल लाईफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, त्यात बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार भाईजानची हिरोईन?
Embed widget