Rain: पाण्याची आवक वाढताच जायकवाडीचा विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Aurangabad Rain News: सद्या धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून एकुण 18 हजार 864 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
![Rain: पाण्याची आवक वाढताच जायकवाडीचा विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा maharashtra News Aurangabad News As the inflow of water increased the discharge of Jayakwadi increased Vigilance alert for riverside villages Rain: पाण्याची आवक वाढताच जायकवाडीचा विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/25152607/Jaikwadi-Dam-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तर गंगापूर धरणातून 2 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वरील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने औरंगाबादच्या जायकवाडी धरणातील (jayakwadi dam) पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्या धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून एकुण 18 हजार 864 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
तब्बल 20 दिवसांच्या खंडानंतर पावसाने औरंगाबाद जिल्ह्यात हजेरी लावली आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात सुद्धा काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून 2 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
आत्ताची परिस्थिती...
जायकवाडी धरणाचे द्वार क्रमांक 11,26, 13, 24, 15,22, 17 व 20 असे एकुण 08 दरवाजे अर्धा फुट उंचीवरुन 1 फुट उंचीवर करण्यात आले आहे. तर सर्व आठही दरवाज्यातून गोदावरी नदीपात्रात एकुण 18 हजार 864 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाची दमदार हजेरी...
गणपतीच्या आगमनाबरोबरच औरंगाबाद जिल्ह्यात दमदार पावसाचे सुद्धा पुन्हा आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. कालपासून औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतांना पाहायला मिळत आहे. तर आज सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे जायकवाडी धरण परिसरात सुद्धा पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे.
Nashik Rain : नाशिकसह परिसरात मुसळधार पाऊस, गंगापूरसह दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
पिकांना जीवनदान...
तब्बल 20 दिवसांच्या खंडानंतर औरंगाबादमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाकडे नजरा लावून बसलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पिकांनी माना टाकायला सुरवात केली होती. अशात पावसाचे आगमन झाल्याने आता पिकांना जीवनदान मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)