भाजपमध्ये गेल्यावर 'ईडी'ची कारवाई झाल्याचं दाखवा आणि दहा लाख मिळावा; औरंगाबादमध्ये बॅनरबाजी
Aurangabad News: भाजपमध्ये गेल्यावर 'ईडी'ची कारवाई झाल्याचं दाखवा आणि दहा लाख मिळावा असा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आला आहे.
Aurangabad News: संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर 'ईडी' म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर भाजपकडून ईडीचा वापर केला जात असून, विरोधकांना आपल्या पक्षात आणण्यासाठी 'ईडी'चा वापर केला जात असल्याचा आरोप सतत होतोय. दरम्यान औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने याविषयी शहरात भन्नाट होर्डिंग लावले आहे. भाजपमध्ये गेल्यावर 'ईडी'ची कारवाई झाल्याचं दाखवा आणि दहा लाख मिळावा असा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आला आहे. सोशल मीडियामध्ये या फोटोची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई झाल्यावर ते भाजपमध्ये जात आहे. तर भाजपमध्ये जाताच कारवाईची फाईल बंद होते असा आरोप विरोधकांडून केला जात आहे. या सर्व चर्चेत सोशल मीडियावर एक फोटो कालपासून प्रचंड व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरात ईडीच्या कारवाईबाबत ठीक-ठिकाणी हे बॅनर लावले असून, ज्यात दहा लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली.
बॅनर नेमकं काय लिहले आहे?
अक्षय पाटील यांनी लावलेल्या बॅनरवर, 'भाजप नेत्यावर ईडी, सीबीआय, आयकर कारवाई झाल्याचे आणि भाजपात गेल्यावर कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा व लाख रुपये मिळवा असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचे हेच बॅनर कालपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भाजपवर सतत आरोप...
देशभरात राजकीय नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया फक्त विरोधी पक्षातील लोकांवरच केल्या जात असल्याचे आरोप सतत होत आहे. 2014 नंतर या कारवायाच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. विरोधकांना दाबण्यासाठी, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप वापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांवर अशी कारवाई झाली त्याने भाजपमध्ये प्रवेश करताच कारवाईची फाईल बंद होते, असाही आरोप सतत केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या...
Rahul Gandhi Support Sanjay Raut : संजय राऊतांच्या समर्थनार्थ राहुल गांधी मैदानात, म्हणाले...