Aurangabad: पोलिस आयुक्त कार्यालयासमोरच महिलेचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, अंगावर घेतले...
Aurangabad : जखमी महिलेला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयासमोर काही वेळापूर्वी एका महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर जखमी महिलेला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजेच्या सुमारास एका महिलेने औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन पेटवून घेतले आहे. घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विजवत तिला घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादाच्या करणातून या महिलेने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेचे आणि तिच्या पतीचे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. तर याप्रकरणी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. मात्र आज या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न कशामुळे केला याचे कारण अजुनही समजू शकले नाहीत.
रुग्णालयात उपचार..
या महिलेने थेट पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोरच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरु आहे. तर या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.