संतापजनक! 50 वर्षीय महिलेवर 55 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल
Aurangabad Crime News: याप्रकरणी बिडकीन पोलिसात (Bidkin Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील शिवनाई गावात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, एका पन्नास वर्षीय महिलेवर गावातीलच 55 वर्षीय व्यक्तीने बलात्कार (Rape) केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी बिडकीन पोलिसात (Bidkin Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रशीद हुसेनखान पठाण ( वय 55 वर्षे, रा. शिवनाई ता.पैठण) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठणच्या बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनाई येथे शेतात शेतात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेवर 55 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिडकीन जवळ असलेल्या शिवनाई गावातील एका शेतात पीडीत महिला कापूस वेचण्यासाठी गेली होती. दरम्यान याचवेळी गावातील रशीद हुसेनखान पठाण तिथे आला. गावातील व्यक्ती असल्याने आणि ओळखीचा असल्याने महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष करत कापूस वेचणी सुरु ठेवली. मात्र आरोपीने महिलेचा चेहरा दाबून तिला कापसात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेने बिडकीन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रशीद हुसेन पठाण याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावात खळबळ....
गावातील एका 55 वर्षीय व्यक्तीने आपल्याच गावातील 50 महिलेवर अत्याचार केल्याची घटना कळताच गावात खळबळ उडाली आहे. सुरवातीला याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र गुन्हा दाखल होताच रशीद पठाणच्या कृत्याची माहिती गावभर पसरली. तर या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. वयाच्या 55 वर्षी अशाप्रकारे घाणेरडे कृत्य करणाऱ्या रशीद पठाणच्या विरोधात गावात संताप देखील पाहायला मिळत आहे. तर बिडकीन पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महिलेचा चौघांकडून विनयभंग...
दुसऱ्या एका घटनेत औरंगाबादच्या घारदोन तांडा येथे एका 22 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडीत महिला घरात एकटीच असतांना चौघांनी घरात येऊन महिलेचा हात पकडून तिला आधी मारहाण केली. त्यानंतर महिलेसोबत अंगलट करून तिचा विनयभंग केला असल्याची तक्रार महिलेने पोलिसात दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.