औरंगाबादकरांची चिंता वाढली! चोवीस तासांत 12 डेंग्यूसदृश रुग्ण, आरोग्य विभागात खळबळ
Aurangabad Dengue Cases : एकाच दिवसात 12 डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Aurangabad News: आधीच स्वाईन फ्लूमुळे चिंता वाढली असतांना आता औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढतांना पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यात 12 डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. यात 6 रुग्ण शहर आणि 6 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. विशेष म्हणजे याचदरम्यान सोमवारी आणखी 4 स्वाईन फ्लूचे रुग्ण सुद्धा आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आता डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजारांनी डोके वर काढले असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 12 डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असल्याने खळबळ उडाली आहे. यातील 6 रुग्ण हे शहराच्या विविध भागांतील असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयातच उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.तर इतर 6 रुग्ण ग्रामीण भागातील असल्याचे समोर आले आहे.
एकाचा मृत्यू,पण...
जिल्ह्यात एकाच वेळी 12 डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असतनाच, शहरातील एका खासगी रुग्णालयात सोमवारी उपचारादरम्यान डेंग्यू सदृश आजाराने एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, या रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झालेला नसल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी स्पष्ट केले आहे.
या भागात आढळले रुग्ण
कोरोना आणि स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून येत असतानाच आता डेंग्यूची भर पडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवसांत 12 रुग्ण आढळून आली असून, ज्यात औरंगाबाद तालुक्यात 3, सोयगाव तालुक्यात 1, खुलताबाद तालुक्यात 2 आणि पालिका हद्दीत 4 रुग्णांचे निदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाचे 9 रुग्ण आढळले...
एकीकडे स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून येत असतांना दुसरीकडे कोरोना सुद्धा काही पाठ सोडायला तयार नाही. जिल्ह्यात मंगळवारी एकूण 9 नवीन रुग्णांची भर पडली आहे. ज्यात शहरातील 9 तर ग्रामीण भागातील 1 रुग्णाचा समावेश आहे. तर 10 जण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे सद्या जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 21 रुग्ण सक्रीय असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Lumpy Skin Disease : मराठवाड्यात 197 जनावरांना लम्पी स्कीनची लागण, 53 गावांमध्ये संसर्ग
Abdul Sattar : औरंगाबाद खंडपीठाचा अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका; नोटीसही बजावली
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )