Aurangabad: आधी अंघोळीचा व्हिडीओ काढला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर नेऊन...
Aurangabad: विशेष म्हणजे, आरोपीने अत्याचाराचाही व्हिडीओ बनवला आणि तो पीडितेच्या नातेवाइकांना पाठवला.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या मुकंदवाडी पोलीस ठाणे हद्दीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. आधी विवाहितेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला. नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने अत्याचाराचाही व्हिडीओ बनवला आणि तो पीडितेच्या नातेवाइकांना पाठवला. त्यामुळे विवाहितेने मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेऊन नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भानुदास किशन घोडे (वय 40, ह.मु. मुकुंदनगर, मूळ रा. सेलू, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी पीडिता कुटुंबीयांसह राहते. आरोपी भानुदास घोडे आणि तिचा पती सोबतच कामाला जायचे. त्यामुळे आरोपी आणि पीडिता यांची चार वर्षांपासून ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी भगवान घोडेने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करायला लागला. एक दिवशी त्याने आपल्यासोबत येण्यासाठी पिडीत महिलेला धमकी दिली. भीतीपोटी पीडिता घोडेसोबत वेरूळ येथील एका लॉजवर गेली. तेथे त्याने अत्याचार केला. त्याचादेखील मोबाईलमध्ये व्हिडीओ बनविला. त्या व्हिडीओवरून त्याने पुन्हा ब्लॅकमेल करायला सुरवात केली.
पुन्हा अत्याचार...
वेरूळ येथील लॉजवर नेऊन केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीने जून महिन्यात पुन्हा पीडितेला शहरातील जयभवानी चौकातील मातोश्री लॉजवर नेले. तेथेही त्याने पीडितेवर अत्याचार केले. मात्र, या ठिकाणी पीडितेने त्याचा मोबाइलच बकेटमधील पाण्यात फेकला. त्यानंतर ती तेथून बाहेर पडली. घोडेकडील सर्व व्हिडीओ आता नष्ट होतील, असे तिला वाटल्याने तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते.
पीडितेच्या नातेवाइकांना पाठवला व्हिडिओ...
आरोपीने महिलेवर अत्याचार करतांनाचा व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे तो तिला सतत ब्लॅकमेल करायचा. मात्र आपण आरोपीचा मोबाईल पाण्यात फेकल्याने व्हिडिओ सुद्धा नष्ट झाले असेल असे समजत पीडता आता आरोपीच्या धमकीला भीक घालत नव्हती. मात्र 2 ऑगस्टला आरोपीने तिच्या पतीच्या व मेहुण्याच्या व्हाट्स ॲपवर पिडीतेचे व्हिडीओ पाठविले. त्यांनतर महिलेच्या तक्रारीवरून भानुदास किशन घोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.