एक्स्प्लोर

Aurangabad Crime News: पुण्यानंतर आता औरंगाबादमध्ये कोयत्यानं प्राणघातक हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Aurangabad Crime News: या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि परिसरात कोयता गॅंगची मोठ्याप्रमाणावर दहशत पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत पुण्यात अनेक ठिकाणी कोयता गॅंगकडून हल्ले करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. मात्र आता पुण्यातील कोयता पॅटर्न औरंगाबादमध्ये (Aurangabad) देखील पाहायला मिळाला आहे. कारण वाळूज महानगर परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून चक्क एका 26 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान इसाक शेख आणि इरफान इसाक शेख (रा. सावखेडा तालुका गंगापूर) असे दोन्ही आरोपींचे नावं आहे. तर शुभम भानुदास जाधव (वय 26 वर्षे रा. सावखेडा) असे हल्ला करण्यात आलेल्या जखमी तरुणाचे नाव आहे. 

जखमी शुभम भानुदास जाधव याने वाळूज पोलिसांत दिलेल्या फिर्यादिनुसार, इरफान इसाक शेख व त्याचा भाऊ इम्रान इसाक शेख असे दोघेही त्यांच्याच गावात राहतात. तसेच नेहमी वेगवेगळ्या कारणांनी शुभमसोबत वाद करत असतात. मात्र एकाच गावातील असल्याने शुभमने नेहमी त्यांच्याकडे दुलर्क्ष केले. दरम्यान, 2 जानेवारी सकाळी 11 वाजता शुभम हा सावखेडा येथील शिवाजी चौकात चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसला होता. यावेळी तिथे इरफान आणि इम्रान दोघेजण आले. तसेच इरफानने एकाला फोन लावून, माझ्या व्याजाचे पैसे न देता तू पळून जाणार असल्याचं मला शुभमने सांगितले असल्याचं सांगितले. त्यामुळे बाजूला असलेल्या शुभमने याबाबत त्याला जाब विचारला असता वादाला सुरुवात झाली. 

आधी वाद मिटला पण पुन्हा... 

मी कोणाबाबत काहीही बोललो नसताना माझ्या नावाची इतरांना खोटी माहिती देऊन आमच्यात वाद कशाला लावत असल्याचा जाब शुभमने इरफानला विचारला. तसेच शुभमने समोरील व्यक्तीला घटनास्थळी फोनं करून बोलवून घेतले. आपण कोणाबद्दल काहीही बोललो नसल्याचा खुलासा करायला लागला. त्यामुळे संतापलेल्या इरफाने शुभमची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. तेवढ्यात इम्रान देखील पळत आला आणि त्याने शुभमच्या तोंडात चापटाने मारहाण केली. यावेळी बाजारचा दिवस असल्याने लोकांची गर्दी झाली. तर नागरिकांनी दोघांचे वाद मिटवत त्यांना वेगळे केले. 

'इसको जान से मार डाल' म्हणत केला हल्ला 

गावकऱ्यांनी वाद मिटवल्यानंतर शुभम गावातील पांढर ओहळ येथील लिपाने यांच्या दुकानाजवळ येवुन थांबला. दरम्यान याचवेळी तिथे इरफान आणि इम्रान हे दोघे भाऊ पुन्हा मोटारसायकलवर बसून आले. तर 'इसको जान से मार डाल' असे इम्रान म्हणाला. त्यामुळे हातातील लोखंडी कोयता घेऊन आलेल्या इरफानने शुभमवर हल्ला करत त्यांच्या डोक्यात कोयत्याने मारहाण केली. दरम्यान यावेळी शुभम जीव वाचवून पळत असताना, पुन्हा त्याचा पाठलाग सुरु केला. मात्र कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला आणि वाळूज पोलिसात पोहचला. पोलिसांनी आधी त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तसेच त्यानंतर इम्रान आणि इरफान दोन्ही भावांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी एकाला अटक देखील केली आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

संतापजनक! दोघांच्या भांडणात कुत्री भुंकली म्हणून डोक्यात फावडे घातले अन् घेतला जीव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget