Aurangabad: अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवला, गर्भवती राहिल्यावर...; वाळूज उद्योगनगरीतील भयंकर घटना
Aurangabad Crime News:आरोपीने मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर सतत अत्याचार केले.
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज उद्योगनगरीत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, 22 वर्षीय परप्रांतीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गुंगीचे औषध पाजून अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीने अत्याचार करतानाचा बनवत तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. या घटनेने खळबळ उडाली असून, याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. सय्यद नबी सय्यद लाला (वय 35 वर्षे, रा. रांजणगाव) असे या नराधमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ही मध्यप्रदेशातील आहे. मात्र तिच्या वडिलांचे निधन झाल्याने आणि परिस्थिती बिकट असल्याने ती 2016 मध्ये रोजगाराच्या शोधात वाळूज एमआयडीसीत आली होती. दरम्यान तिला एका कंपनीत रोजगार मिळाल्याने ती पंढरपुरात राही लागली. याच काळात तिची सय्यद नबी याच्यासोबत ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेत सय्यद नबी याने लग्नाचे आमिष दाखवून या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला...
सुरवातीला पंढरपुरात वास्तव्यास असलेली पिडीत तरुण मुलगी पुढे वडगावात राहण्यासाठी गेली. त्यांनतर एक दिवस सय्यद नबी याने तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचार करतानाचा तिचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करून ठेवला. यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सतत अत्याचार केला.
मुलगी गर्भवती राहिली...
आरोपीने अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर सतत अत्याचार केले. त्यांनतर दोन वर्षांपूर्वी ती गर्भवती राहिली. त्यामुळे लग्नाचे आमिष दाखवून पुन्हा अत्याचार सुरूच ठेवला. या काळात पिडीत मुलीला एक मुलगा झाला. त्यामुळे मुलीने सय्यद नबीकडे लग्नाचा तकदा लावला. मात्र आरोपी लग्नासाठी टाळाटाळ केल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागली. दरम्यान याच वादातून नबीने पिडीत मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे अखेर त्या मुलीने पोलिसात धाव घेऊन नबी विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.