(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: सेनेतील नाराजीनाट्य सुरु असतानाच औरंगाबादचे 'हे' आमदार नॉटरिचेबल
Aurangabad News: मराठवाड्यातील दोन मंत्र्यांसह पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे.
Aurangabad News: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि 11 आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
कोणते आमदार...
औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांच्या यादीत मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत,आमदार संजय शिरसाठ, वैजापूर आमदार रमेश बोरनारे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील या पाच आमदारांचा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.
नॉट रिचेबल आमदार:
1) साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
2) सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
3) उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
4) पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
5) बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
6) मेहकरचे आमदार संजय गायकवाड
7) बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांचा मोबाईल बंद आहे
8) सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
9) पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
10) औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
11) कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
12) वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
13) भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
14) महाडचे भरत गोगावले नॉट रिचेबल