एक्स्प्लोर

मराठा आरक्षण कायदा झाला नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाईल : हर्षवर्धन जाधव

मला औरंगाबाद लोकसभेत 2 लक्ष 83 हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत. जर मराठा आरक्षण कायदा झाला नाहीतर मराठा समाज वंचित आघाडीसोबत दिसेल, असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असे मत औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावं ही मागणी मला तळागाळातुन येत आहे. यासाठी भाजप- शिवसेना सरकारने जर एका महिन्यात यावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच प्रकाश आंबेडकर यांना भेटणार असल्याचे देखील जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. मला औरंगाबाद लोकसभेत 2 लक्ष 83 हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत. जर मराठा आरक्षण कायदा झाला नाहीतर मराठा समाज वंचित आघाडीसोबत दिसेल, असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. औंरंगाबादेत 'ट्रॅक्टर'चा फॅक्टर महत्वाचा ठरला शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवत खैरेंना थेट आव्हान दिले. 'ट्रॅक्टर' ही निशाणी घेऊन मैदानात उतरलेल्या जाधव यांनी 2 लाख 83 हजारांपेक्षा जास्त मतं घेतली. चंद्रकांत खैरेंना याचाच फटका बसला आणि त्यांचा पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत जावयाला मदत केली असा आरोप देखील खैरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची देखील बरीच चर्चा झाली. गेली 20 वर्षे औरंगाबादचं खासदारपद भुषवणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करत वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिलेले एमआयएमचे इम्तियाज जलील 3 लाख 88 हजार 957 मतं घेत औरंगाबादचे खासदार म्हणून विजयी झाले. चंद्रकांत खैरेंचा त्यांनी 4 हजार 679 मतांनी पराभव केला. 1999 पासून सलग चार वेळा औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे लोकसभेवर निवडून गेले आहेत. सलग वीस वर्षे खासदार राहिलेल्या खैरेंना यावेळी एमआयएमच्या इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचं आव्हान होतं. त्यासोबतच काँग्रेसकडून सुभाष झांबड यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीत चर्चा चंद्रकांत खैरे, हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांचीच होती.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget