एक्स्प्लोर

मोबाईल चोरी गेलाय घाबरू नका! एका क्लिकवर मिळवा तुमच्या फोनची माहिती

मोबाईल चोरीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. यासाठी आता एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मोबाईल शोधणं सोपं होणार आहे.

औरंगाबाद : दिवसोंदिवस मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे, चोरीला गेलेल्या मोबाईलच्या गैरवापराचीही अनेकांना भिती वाटते. मात्र, हाच सगळा प्रकार टाळण्यासाठी आता सरकारनचं नवी उपाययोजना केली आहे. आता तुमचा मोबाईल चोरीला गेला तरी सुद्धा तो कुणीही वापरू शकणार नाही. मोबाईल चोरींच्या घटनांचा आकडा मोठा आहे, यालाच काही प्रमाणात चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं ही वेबसाईट सुरू केली आहे. सध्या मोबाईल चोरींच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे. औरंगाबाद सारख्या शहरात महिन्याला किमान 100 वर मोबाईल चोरी आणि हरवण्याची नोंद होते. देशात हा आकडा किती मोठा असेल? यालाच काही प्रमाणात चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं एक नवी वेबसाईट सुरू केली आहे. सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर म्हणजे CEIR असं या बेवसाईटचं नाव आहे. जर तुमचा मोबाईल चोरी गेला, तर त्याचा आयएमईआय(IMEI)नंबर तुम्हाला या वेबसाईटवर रजिस्टर करायचा आहे. त्याद्वारे तुमचा मोबाईल डिव्हाईस तातडीनं ब्लॉक करण्याची सुविधा आहे. याची माहिती देशातील सर्व मोबाईल नेटवर्क कंपन्यांना पाठवली जाणार आहे. सोबतच पोलिसांना मोबाईल ट्रँकही करता येणार आहे. चोरी गेलेला वा हरवलेल्या मोबाईलमध्ये कुणी दुसरं सीमकार्ड टाकलं तर तातडीनं याची माहिती तक्रार केलेल्या पोलिस ठाण्यात मिळेल आणि चोर पकडला जाईल. मोबाईल सापडल्यावर अनब्लॉक करण्याची सोय - या वेबसाईटवरुन फक्त मोबाईल डिव्हाईस लॉकच करता येणार नाही, तर मोबाईल सापडल्यावर तो अनब्लॉक करण्याची सोय देखील देण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे फक्त मोबाईल चोरी रोखणं इतकाच उद्देश नाही, तर तुम्ही जुना मोबाईल विकत घेत असताना तो चोरीचा आहे का? वा स्वस्तात मोबाईल विकत घेताना तो बनावट तर नाहीना? याचीची तपासणी करण्याची सोय या वेबसाईटवर आहे. नोन युवर मोबाईल(KNOW YOUR MOBILE )या लिंकवर क्लीक करुन त्यावर आयएमईआय नंबर टाकल्यावर क्षणार्धात तो मोबाईल चोरीचा वा बनावट आहे याचीची माहिती यात मिळणार आहे. परिणामी यापुढं तुमचा चोरी गेलेला स्मार्टफोन कुणाच्याही कामाचा राहणार नाहीये. त्यामुळंचं यातून चोरी होण्याचं प्रमाणही कमी होईल असं पोलिसांना वाटतं. नागरिकांचं बनावट फोननं नुकसान होवू नये, फोन चोरीला गेल्यावरही त्याचा कुणाला उपयोग करता येऊ नये यासाठीच ही बेवसाईट सुरु करण्यात आली आहे. त्यामुळं तुमचा फोन चोरीला गेला असल्यास तुम्ही देखील या बेबसाईटचा नक्कीच वापर करू शकता. हेही वाचा - एसटीच्या चालक, वाहकांना ऑन ड्युटी मोबाईल वापरास बंदीचं फर्मान Bus | भंगारातील बसेसचं मोबाईल टॉयलेट, नवी मुंबई महानगरपालिकेची शक्कल | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget