एक्स्प्लोर

परप्रांतीय मजूर गेले ही महाराष्ट्राला संधी; स्थानिक तरुणांनी याचा फायदा उचलावा : सुभाष देसाई

लॉकडाऊनमुळे प्ररप्रांतीय आपापल्या राज्यात परतत आहेत. यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. याचा फायदा स्थानिकांनी घ्यावा, असा सल्ला सुभाष देसाई यांनी दिला.

औरंगाबाद : परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात गेले ही महाराष्ट्राला संधी आहे. उद्योजकांनी स्थानिक तरुणांना नोकरी द्यावी आणि स्थानिकांनी ही संधी सोडु नये, असा सल्ला उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिलाय. खरं तर आम्ही या मजुरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजूर थांबले नाहीत. त्यामुळे राज्यातील बेकारी दूर होईल, हे देखील उद्योग मंत्री सुभाष देसाई सांगायला विसरले नाहीत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुभाष देसाई औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

लॉकडाऊनमुळे प्ररप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतत आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी संधी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत उद्योजकांनी स्थानिक तरुणांना संधी देण्याची विनंती देसाई यांनी केली. सोबतचं स्थानिक तरुणांनी याचा फायदा उचलावा असाही सल्ला दिला.

चिखलठाणा परिसरात 250 खाटा असलेले कोविड रुग्णालय उभारणार येत्या महिनाभरात औरंगाबादच्या चिखलठाणा परिसरात 250 खाटा असलेले कोविड रुग्णालय उभारण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली.  शहरात 55 वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. महापालिकेने 12 कंटेनमेंट झोन निर्माण केले आहे. याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले. यापुढे औरंगाबादेत बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. संचारबंदी कडक असेल, पोलीस अगदी गल्ली पोलिसिंग सुद्धा करतील असे सांगत गरज पडल्यास आता औरंगाबादेत सीआरपीएफ नेमण्यात येईल, असा इशारा सुभाष देसाई यांनी दिला. शहरात आतापर्यंत 216 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याचंही देसाई म्हणाले.

... त्यावेळी खडसेंनी खंजीर खुपसला नाही का?, एकनाथ खडसेंच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर

राज्यात 34 हजार उद्योग सुरू झालेत उद्योगांबाबत राज्यात आतापर्यंत 64493 उद्योगांना परवानगी दिली आहे. त्यापैकी 34 हजारांवर उद्योग सुरू झाले असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली. यातून 10 लाख लोकांचे रोजगार सुरू झाले आहेत, असे सांगत अर्थचक्राला चालना देण्याचा प्रयत्न सुरुय, असे देसाई म्हणाले. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्याचा फायदा होईलच. मात्र, राज्य सरकारसुद्धा याबाबत विचार करत आहे. आम्हीही  पॅकेज जाहीर करण्याबाबत विचार करतोय, असं त्यांनी सांगितले. ज्यांना नव्याने उद्योग सुरू करायचे आहेत. त्यांनी मजबूत प्रपोसल द्यावे, त्यांना तात्काळ परवाना मिळेल. त्यांनी उत्पादन सुरू करावे. उर्वरित परवानगी त्यांनी 3 वर्षात देऊ असे देसाई म्हणाले.

Lockdown 3 | लॉकडाऊनमध्ये सुमारे सहा लाख कामगारांच्या हाताला पुन्हा काम, 25 हजार कंपन्या सुरू, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget