Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करणार अनावरण
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आज आणि उद्या असा दोन दिवसांचा असणार आहे.
CM Eknath Shinde Aurangabad Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आज आणि उद्या असा दोन दिवसांचा असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण पार पडेल. हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला होता.
असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम
औरंगाबाद, दि.15 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 आणि 17 सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि.16 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी. 2.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि तेथून मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण
दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव
दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण.
दुपारी 4.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आणि राखीव.
सायं. 05.30 वाजता विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री. विजय पाटील, यांचे कार्यालयास भेट आणि राखीय, (स्थळ:- सिध्दार्थ गार्डन शेजारी, औरंगाबाद.)
सायं 05.45 वाजता सिध्दार्थ गार्डन येथून मोटारीने तापडिया नाट्य मंदिराकडे प्रयाण.
सायं 6.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद.)
सायं. 06.30 वाजता तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
रात्री 07.15 वाजता शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव आणि मुक्काम.
शनिवार, दि.17 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 06.30 वाजता शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने सिध्दार्थ उद्यानाकडे प्रयाण.
सकाळी 07.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम. (स्थळ : सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.)
सकाळी 07.15 वाजता सिध्दार्थ उद्यान औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण
सकाळी 07.35 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि शासकीय विमानाने हैदराबाद विमानतळाकडे प्रयाण.
महत्त्वाच्या इतर बातम्या