औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा
Aurangabad Bhondubaba : औरंगाबादच्या पारुंडी गावातील बाबासाहेब शिंदे नावाचा व्यक्ती येशूची पार्थना करून डोक्यावर हात ठेवल्याने आजार बरे होतात असा दावा करतोय.
![औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा Bhondubaba claiming to cure illness by placing his hands on his head aurangabad news औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/19/1d6263cf6118d17f5dd84ec6b383bfff166357325041789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण विश्वास ठेवला का. तर साहजिकच 21 व्या शतकातही अशी घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या पारुंडी गावात बाबासाहेब शिंदे नावाचा व्यक्ती येशूची पार्थना करून डोक्यावर हात ठेवल्याने आजार बरे होतात असा दावा करतोय. यासाठी दर शुक्रवारी हजारो गोरगरीब लोक आपले आजार बरे करण्यासाठी गर्दी करतात. एबीपी माझा आणि अनिस यांनी या ठिकाणी जाऊन या सगळ्या अंधश्रद्धेचा भांडाफोड केला.
पारुंडी गावात गेल्या काही वर्षांपासून दर शुक्रवारी या बाबाचा म्हणजेच फास्टरचा दरबार भरतो. गाव खेड्यातील हजारो लोकं शिंदेचा हात डोक्यावर ठेऊन आपला आजार बरा करण्यासाठी दर शुक्रवारी गर्दी करतात. खेडेगावातील कॅन्सर, बीपी, शुगर, पोटदुखीचा आजार यासह अनेक दुर्धर आजारांनी त्रस्त मंडळी इथे येतात. येशूच्या प्रार्थनेनं आपला हा डोक्यावर ठेवल्याने हे आजार बरा होत असल्याचा शिंदेचा दावा आहे. एवढेच नाही तर या दुर्धर आजारावरील गोळ्याही लोकांनी घेणं सोडून दिल्याचा शिंदेचा दावा आहे. स्वतःला मास्टर म्हणून सांगणारा बाबासाहेब शिंदे नावाचा हा व्यक्तीची दावे ऐकून तुम्हीही चकित व्हाल.
ज्या लोकांवर डॉक्टरही उपचार करू शकले नाहीत त्यांना सुद्धा आपण येशुंच्या आशीर्वादाने बर केल्याचा दावाही हा मास्टर बाबानं केलाय. औरंगाबाद, जालना बीडसह अनेक जिल्ह्यातून गाव खेड्यातील लोकं श्रध्देपोटी येथे येतात. कुणाला कंबरेचा आजार आहे तर, कुणाचे डोळे गेली आहेत, पण सर्वांचा इलाज फक्त डोक्यावर हात ठेवल्याने बरा होत असल्याच्या अपेक्षने लोकं येथे येतात. या सर्व प्रकारावर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला असून, हा धर्म प्रसाराचा प्रकार नसून, लोकांच्या जीवांशी खेळण्याचा प्रकार आहे. यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मते, हे धर्मवाढी बरोबर अंधश्रद्धा पसरवण्याचे काम सुरू आहे.
बाबासाहेब शिंदे यांच्या या आजार बरे करण्याचा दाव्यावर आम्ही अल्फा ओमेगा ग्रुपच्या अध्यक्षांना विचारलं त्यावेळी त्यांनीही असल्यास तोंडावर टीका केली आणि 'बायबल' असं सांगत नसल्याच ही म्हटलं. पण प्रश्न हा आहे या बाबाच्या नादी लागून लोकांनी कॅन्सर, बीपी शुगर सारख्या गोळ्या घेणं सोडून दिलं आणि त्यांचा आजार बळावला तर त्याला जबाबदार कोण? आणि यात कुणाचा मृत्यू झाला तर याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे मंडळी असल्या डोक्यावर हात ठेवल्याने जर लोक बरे झाली असती तर तरुणांनी एमबीबीएस, एमएस या अभ्यासक्रमात वर्षानूवर्ष घालण्याऐवजी बाबासाहेबाचं शिष्यत्व पत्करला असतं आणि वैद्यकीय महाविद्यालय ओस पडली असती. त्यामुळे अशा लोकांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा..
एबीपी माझाची टीम आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रतिनिधी येथे पोहोचले तेव्हा आम्हाला तिथे बाबासाहेब शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांनी घेरलं. आमच्यावर पाळत ठेवली. अंनिसच्या प्रतिनिधी यांना काही काळ पकडून ठेवलं होतं. कॅमेऱ्यासमोर बोलताना बाबाचं पितळ उघडं पडलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)