एक्स्प्लोर
औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा दावा
निवडणुका आल्या की ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्याचा वल्गना राजकीय व्यासपीठावरून सुरु होतात. याच संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील. औरंगाबादचं नाव कधीही संभाजीनगर होऊ शकतं, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. याविषयी बोलताना खैरे यांनी हा दावा केला आहे. नामांतराची ही मागणी मूळ शिवसेनेची आहे. मात्र ती हायजॅक करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे..
यावेळी खैरे म्हणाले की, राष्ट्रवादीत देखील संभाजी महाराजांना मानणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे त्यांचाही यासाठी विरोध नसेल. उद्धव ठाकरे गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासंदर्भात माहिती घेत आहेत, अशी माहिती देखील चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
'औरंगाबाद की संभाजीनगर' काय आहे इतिहास, जाणून घ्या
ते म्हणाले की, मनसे संभाजीनगरचा मुद्दा घेऊन पुढे जात आहे, तो मुद्दा त्यांनी टिकवावा. धरसोड वृत्ती कामाची नाही, असा टोला मनसेला लगावला. हिंदुत्व आम्ही कधी सोडलेलं नाही. कधी सोडणार देखील नाही. 8 मे 1988 रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घोषित केलं आहे. त्याबाबत आम्ही मनपात ठराव घेतले. तसेच मी लोकसभेत देखील मुद्दा उपस्थित केला होता. अनेकदा मी मोदींना पत्र लिहिलं, असंही खैरे म्हणाले. आता उद्धव ठाकरे यांनी नाव बदलण्याच्या दृष्टीने माहिती मागितली आहे. लवकरात लवकर संभाजीनगर नाव दिलं जाईल, असा दावा त्यांनी केला. तो मनसेमुळे नाही, आम्ही ते आधीपासून बोलत आहोत, असंही ते म्हणाले.
MNS in Aurangabad | मनसेच्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर, शिवसेनेचा मुद्दा मनसेकडून हायजॅक
कॉंग्रेस- राष्ट्रवादीशी देखील यासाठी सकारात्मक चर्चा केली जाईल. राष्ट्रवादीचा याला विरोध नसेलच असे देखील ते म्हणाले.
आमचं उष्ट कोणी खाऊ नये.. औरंगाबादच्या नामकरणावरुन गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक टोला
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























