एक्स्प्लोर

Aurangabad Renamed : खडकी ते औरंगाबाद आणि आता संभाजीनगर, काय आहे या शहराच्या नावाचा इतिहास?

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar ) असे नामांतर करण्यात आले आहे. पण या शहराचा नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला

औरंगाबाद :  राज्यातील आज  मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातील  औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची जुनी मागणीला मान्यता देण्यात आली आहे.  बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर ए अंबरी अशा एक ना अनेक ऐतिहासिक वास्तू असलेल्या औरंगाबाद या शहराचा नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद पुरातन आणि इतिहासाचं वरदान असलेल हे शहर आहे. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर ए अंबरी अशा एक ना अनेक वास्तूंनी या शहराला सुशोभित केले आहे.  निवडणुका आल्या की,  ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्याचा वलगना  राजकीय व्यासपिठावरून सुरु होतात. आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अखेर ठाकरे सरकारने औरंगाबादच्या नामांतराल मान्यता दिली आहे.

औरंगाबाद शहराचा नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय?

मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता त्यात औरंगाबादचं नाव 'राजतडक' असल्याचं आढळून आले आहे.  हे नाव कुणी ठेवले त्या नावाचा वास्तिविकतेशी काय संबंध यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही. या शहराचं नावाजलेलं नाव हे खडकी आहे. हा परिसर बेसॉल्ट खडकावर वसलेला आहे. त्यात शहरात अगदी प्राचीन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे.

त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता ख-या अर्थानं 'नहरे ए अंबरी' सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र  त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही.  कालांतरानं 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव 'फतेहनगर' असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगरवरुन 'खुजिस्ता बुनियाद' असे ठेवले.  कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं.  ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.

काळाच्या ओघात औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी झाली. अजिंठा आणि वेरुळ सारख्या वास्तूंमुळे अगदी जगाच्या कानाकोप-यात औरंगाबादचं नाव दुमदुमलं. मात्र हेच नाव आता बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या. नाव बदलण्यामागं राजकारण हे एकमेव कारण असल्याच अभ्यासक  सांगतात.  हा  प्राचीन काळापासून हा ट्रेन्ड सुरु असल्याचे दाखले ते देतात.

आतापर्यंत शहाराच्या नावामागं शहराशी निगडीत सखोल अभ्यास असायचा. संभाजीनगर नावामागंही काही इतिहास आहे का हे सुद्धा शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह आहेत . शिवसेना असो वा भाजप मात्र याचा उपयोग  राजकारणासाठी होतो. कदाचित संभाजी महारांच्या याच इतिहासाच्या प्रेमापोटी आता या शहरचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. किंवा निवडणुका समोर आल्या म्हणून पुन्हा जुना मुद्दा नवीन करण्याचा प्रयत्न आहे.  मात्र वरवर तरी औरंगजेबाचं नाव या शहराला नको अशीच भूमिका शिवसेना मांडत आहे.

 संभाजी महाराजांचा वध औरंगजेबानं केला आहे. त्यामुळं कदाचित त्या औरंगजेबाचं नाव या शहराला नको असे शिवसेनेला वाटत असावे. काळ बदलला मात्र अजूनही सत्ता बदलली की आपल्या पद्धतीनं नाव बदल्याचा प्रयत्न त्या त्या काळातील राजा करतो हेच यामागील सत्य म्हणावे लागेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget