जी-20 च्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद जिल्ह्यात 1400 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त
Aurangabad News: जी-20 परिषदेचा बहुमान यावेळी भारताला मिळाला असून, देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये जी-20 च्या विदेशी पाहुण्यांची बैठका होत आहे.
Aurangabad News: जी-20 परिषदेचा बहुमान यावेळी भारताला मिळाला असून, देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये जी-20 च्या विदेशी पाहुण्यांची बैठका होत आहे. दरम्यान आजपासून जी-20 परिषेदचं महिला शिष्टमंडळ औरंगाबादमध्ये दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस (Chhatrapati Sambhajinagar City Police) आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून (Aurangabad Rural Police) तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर आणि ग्रामीण असा दोन्ही मिळून अंदाजे 1400 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त यासाठी ठेवण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून 970 पोलिसांचा बंदोबस्त
जी-20 परिषदेचे छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी 29 देशातील प्रतिनिधी आणि 15 आंतरराष्ट्रीय संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाने सुरक्षा विषयक जय्यत तयारी केलेली आहे. तर या बंदोबस्ता करीता औरंगाबाद शहर पोलीस दलाचे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्रीमती अपर्णा गिते, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ - 1) दिपक गीऱ्हे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ- 2) शिलवंत नांदेडकर यांचे थेट देखरेखी खाली शहरातील 29 पोलीस निरीक्षक, 90 सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक, 668 अंमलदार, 124 महीला अंमलदार तसेच बाहेर जिल्ह्यातुन 5 पोलीस उप अधिक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 50 सपोनि/पोउपनि हे ही बंदोबस्ता करीता नेमण्यात आलेले आहेत.
10 विभागात बंदोबस्ताचे नियोजन
1) विमानतळ बंदोबस्त,
2) वाहातुक मार्गावरील बंदोबस्त,
3) शहरातील विवीध ठिकाणी VVIP चे निवासस्थान बंदोबस्त,
4) प्रेक्षणिय स्थळे/ ऐतिहासीक ठिकाणी भेटी दरम्यानचा बंदोबस्त
5) घातपात विरोधी तपासणी करीता विशेष पथके,
6) साध्या गणवेशात बंदोबस्त,
7) वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत टास्क फोर्स,
8) दंगाकाबु पथक, क्यु आरटी, व ऐन वेळीचा राखीव बंदोबस्त,
9) VVIP च्या वाहन ताफ्या करीता विशेष बंदोबस्त,
10) गोपनिय कर्तव्यासाठी नेमलेले विशेष पथके
औरंगाबाद ग्रामीणचाही 450 पोलिसांचा फौजफाटा
जगप्रसिद्ध वेरूळ पर्यटनस्थळी जी-20 परिषदेचे सदस्य भेटी देणार आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक विशाल नेहुल, उपअधीक्षक जयदत्त भवर, उपअधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक विजय मराठे यांच्यासह खुलताबादचे पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी जवळपास 450 पोलिस फौजफाटा तैनात असणार आहे. तर औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.