एक्स्प्लोर

Imtiyaz Jaleel: जी 20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार; नामांतरावरून जलील यांचा इशारा

Imtiyaz Jaleel On City Renaming: जी 20 (G-20) परिषदेच्या औरंगाबादच्या बैठकीदरम्यान आंदोलन करण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी दिला आहे. 

Imtiyaz Jaleel On City Renaming: गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून औरंगाबादचे (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) जिल्ह्याचं धाराशिव (Dharashiv) नामांतर करण्याचा मुद्दा प्रलंबित होता. दरम्यान शुक्रवारी (24 फेब्रुवारी) रोजी केंद्राने या दोन्ही शहरांचे नावं बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. मात्र याच निर्णयाला आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोठा लढा उभा करणार असून, रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. तर जी 20 (G-20) परिषदेच्या औरंगाबादच्या बैठकीदरम्यान आंदोलन करण्याचा देखील त्यांनी इशारा दिला आहे. 

यावेळी बोलताना जलील म्हणाले की, फडणवीस साहेब हा जिल्हा माझा असून, कोणाच्या बापाचा नाही. कोणीही माझ्या शहरात येईल आणि हे नाव द्यायचं, ते नाव द्यायचं हा धंदे सुरु आहे का? अशी टीका जलील यांनी केली. जी 20 परिषदेची औरंगाबादमध्ये होणाऱ्या बैठकीच्या दिवशी मी जर विरोध केला तर काय करणार? मी जगाला दाखवेल की हे घाणेरडे राजकारण करत आहेत. आता फडणवीस गृहमंत्री आहेत ना आता त्यांना सांगतो, मी मोठं आंदोलन उभं करणार असल्याचं जलील म्हणाले. 

पुढे बोलताना जलील म्हणाले की, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे एक औरंगाबादकर म्हणून मला याचा दुःख आहे. ज्या लोकांना या निर्णयामुळे आनंद होत आहे, त्यांना सांगतो की? सरकार तुमची आहे. तुम्ही निर्णय घेतला आहे आणि तुम्ही करत राहणार आहेत. पण ज्यांचे नाव शहराला दिला त्यांचा दर्जा शहराला देणार आहे का? असेही जलील म्हणाले. आठ दिवसांनी मिळणारे पाणी उद्यापासून दोन वेळा पाणी मिळणार आहे का? असे प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित करत असल्याचे जलील म्हणाले. 

जलील यांचे ट्वीट...

याबाबत जलील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की,"औरंगाबाद आमचे शहर आहे, होते आणि राहील. आता औरंगाबादसाठी आमच्या शक्ती प्रदर्शनाची वाट पाहा. आपल्या लाडक्या शहरासाठी भव्य मोर्चा... आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी औरंगाबादवासियांनो सज्ज व्हा, आम्ही निषेध करतो आणि आम्ही लढू...." असे जलील यांनी म्हटले आहे. 

आमचा विरोध असणारच...

शहरांच्या नामांतराच्या निर्णयाला आम्ही आधीपासूनच विरोध केला आहे. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नावं बदलण्याचा जो केंद्राने निर्णय घेतला आहे, त्याला देखील आमचा विरोध आहे. यासाठी न्यायालयात आमची कायदेशीर लढाई सुरु असून, आणखी लढा यासाठी उभा करणार असल्याचं जलील म्हणाले. संभाजी महाराजांबद्दल आमच्या मनात आदर आहे. मात्र भाजपकडून शहरांचे नावं बदलून जे काही राजकारण आहे, त्याला मात्र आमचा विरोध होता, आहे आणि राहणार असल्याचं जलील म्हणाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Osmanabad Dharashiv : औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर, सत्ताधाऱ्यांकडून केंद्राच्या निर्णायाचं स्वागत तर विरोधक म्हणतात श्रेय बाळासाहेबांचं

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वासParali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरंCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Embed widget