एक्स्प्लोर

Aurangabad News: शेळ्या चरण्यासाठी घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर केला अत्यचार, आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी

Aurangabad crime News: आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावला.

Aurangabad crime News: अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शेळ्या चरण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या या आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावला. सोबतच ठोठावलेल्या दंडापैकी 20 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेशात म्हटले आहे. राहुल पंडित मगरे (वय 21 वर्षे, रा. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन पीडितेच्या आईने हर्सूल पोलिसात दिलेल्या फिर्यादिवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या आईने हर्सूल पोलिसात दिलेल्या फिर्यादिनुसार, पीडीत मुलगी सकाळी 11 वाजता बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जायची आणि सायंकाळी पाच वाजता घरी येत होती. दरम्यान परिसरात राहणारा राहुल पंडित मगरे हा देखील पीडितेसोबत बकऱ्या चरण्यासाठी नेत होता. त्यामुळे दोघांची ओळख झाली होती. 

पीडितेवर केला बळजबरीने अत्याचार  

दरम्यान एक दिवस पीडिता ही नेहमीप्रमाणे बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेली असता, आरोपीने तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने बकऱ्या दुसरीकडे चरण्यासाठी नेल्या. मात्र घटनेच्या सुमारे 15 दिवसांनंतर पीडिता बकऱ्या चरण्यासाठी कोलठाणवाडी परिसरात घेऊन गेली असता, आरोपी तिला तेथे येऊन भेटला. तसेच त्याने पुन्हा पीडितेवर बळजबरी बलात्कार करून धमकी दिली. 

बहिणीकडे गेल्यावर उघडकीस आला प्रकार 

आरोपीने अत्याचार केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने याबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. दरम्यान 3 नोव्हेंबर 2019 रोजी दिवाळीनिमित्त मुलीची आई आपल्या कुटुंबासह बहिणीकडे गेल्या होत्या. त्यावेळी पीडीत मुलीच्या बहिणीला पीडितेचे ओटीपोट वाढलेले दिसले. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना दाखवले असता, पीडिता सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला! 

पीडीत मुलगी दिवाळीनिमित्ताने आपल्या आईसोबत आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. यावेळी बहिणीला पीडितेचे ओटीपोट वाढलेले दिसल्याने तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करत पीडिता सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने पीडिताच्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad : पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय आला; मित्राला आधी दारू पाजली मग कायमचा काटा काढला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget