Ashadhi wari 2025: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची महापूजा; महाराष्ट्र अन् बळीराजाचे भलं व्हावं यासाठी विठ्ठलाच्या चरणी देवेंद्र फडणवीसांच साकडं!
Ashadhi wari 2025: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केलीय.

Ashadhi wari 2025: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा, दुधाचा अभिषेक
आज आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) आनंदोत्सव पंढरपूरमध्ये (Pandharpur) साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक (Abhishek) करण्यात आला. देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख (Poshakh) परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरती (Aarti) करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. दरम्यान, महिनाभर वारी (Wari) करत चालत असणारे वारकरी (Warkaris) विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य (Ugale couple) हे मानाचे वारकरी (Manaache Varkari) ठरले आहेत. मूळचे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील जातेगावचे असलेले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना विठूरायाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना- मुख्यमंत्री
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
वडाळा येथील विठ्ठल मंदिररात एकनाथ शिंदे यांनी केली सहकुटुंब पूजा
दुसरीकडे वडाळा येथील प्रति पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई यांचा अभिषेक सोहळा पार पडत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंबीय मंदिरात दर्शनासाठी पोहचले आहेत. त्यांच्यासोबत आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर शिवसेना नेते शीतल म्हात्रे उपस्थिती आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे. हे मंदिर पुरातन असून 400 वर्षापूर्वीचे उभारण्यात आल्याचे मंदिराचे ट्रस्टी विश्वस्त उदय दिघे सांगतात. एका वारीत पंढरपूरला गेले वडाळ्यातील वारकरी गेले असताना चंद्रभागेत स्नान करताना त्यांना विठ्ठलाची मूर्ती मिळाली. ती मूर्ती पंढरपुरातून ते वडाळा गावात घेऊन आले. तो दगड ठेवून विठ्ठल-रखुमाईचे मंदिर स्थापन केले. मुंबईतील व मुंबई शेजारील शहरातील ज्यांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक प्रतिपंढरपूर म्हणून उभे केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























