एक्स्प्लोर

यापुढे देशातील एकही मशीद हिंदूंकडे जाऊ देणार नाही; ज्ञानव्यापी मशीदीबाबत ओवैसी काय म्हणाले?

Asaduddin Owaisi on Gyanvapi Mosque : काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानव्यापी मशीदीबाबत (Gyanvapi Mosque) काही निर्णय दिले होते. हिंदूच्या सुरु असलेल्या तळघरातील पूजेला स्थगिती देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

Asaduddin Owaisi on Gyanvapi Mosque : काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानव्यापी मशीदीबाबत (Gyanvapi Mosque) काही निर्णय दिले होते. हिंदूच्या सुरु असलेल्या तळघरातील पूजेला स्थगिती देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. दरम्यान, ज्ञानव्यापी मशीदीबाबत  (Gyanvapi Mosque)ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाष्य केलं आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांननी मशीदीबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. 

कायदेशीर लढाई लढणार 

असुदुद्दीन ओवैसी म्हणाले, "आता मुस्लिम देशातील एकही मशीद हिंदूंकडे जाऊ देणार नाही. न्यायालयात कायदेशीर लढाई लढली जाईल. ज्ञानव्यापी मशीदीबाबतच्या खटल्याबाबत ओवैसी म्हणाले, मशीदीखाली पूर्वी मंदिर होते, असा दावा हिंदूकडून केला जात आहे. " मात्र आम्ही कुठलीही मशीद देणार नाही.आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. आमची या देशात एकदा फसवणूक झाली आहे. आम्ही पुन्हा फसले जाणार नाहीत."

ज्ञानव्यापीच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना प्रार्थना करण्यास मुभा 

उत्तरप्रदेश येथील बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी जमावाकडून पाडण्यात आली होती. १६ व्या शतकात या ही मशीद बांधण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षांच्या न्यायालयाीन प्रक्रियेनंतर तिथे राम मंदिर बांधण्यात आले आहे. दरम्यान, आता न्यायालयाने ज्ञानव्यापी मशीदीबाबत एक निर्णय दिलाय. या निर्णयानुसार, "ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) दक्षिणेकडील तळघरात हिंदू पुजारी प्रार्थना करू शकतात." ज्ञानव्यापी मशीदीबाबत काही तोडगा निघू शकतो का? असा सवाल असुदुद्दीन ओवैसी यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ओवैसी म्हणाले, "मी स्पष्टपणे सांगतो की, आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि आमच्याकडे कोणती कागदपत्रे आहेत आणि आमचे दावे काय आहेत? हे न्यायालयात सांगणार आहोत."

राष्ट्रपती भवन खोदण्यास सुरुवात केली तर आम्हालाही काहीतरी सापडेल

ज्ञानवापी मशिदीच्या खाली हिंदूच्या काही खूणा सापडल्या आहेत. यावर बोलताना ओवैसी म्हणाले, "उद्या जर आम्ही राष्ट्रपती भवन खोदण्यास सुरुवात केली तर आम्हाला काहीतरी सापडेल.आम्ही शेकडो वर्षांपासून या ठिकाणी नमाज अदा करत आहोत. मी हे संसदेत बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो की,हा मुस्लिमांचा प्रश्न आहे.आम्हाला आमच्या पंतप्रधानांवर विश्वास राहिलेला नाही. पंतप्रधान केवळ एका विचारधारेसाठी काम करतात." अयोध्येत शांततेत राम मंदिराची निर्मिती झाली. त्याप्रमाणे ज्ञानवापीबाबत मुस्लिम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. मशीद दुसरीकडे बांधावी, असे राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, देशातील मुस्लिमांना धमकावले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

ECI : खबरदार! लोकसभा निवडणुकीच्या कामात मुलांचा वापर केल्यास कारवाई होणार, निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 August 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
Nashik Earthquake : नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, नाशिक शहर आणि विविध तालुक्यांमध्ये जाणवले धक्के, भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल
नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, नाशिक शहर आणि विविध तालुक्यांमध्ये जाणवले धक्के
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget