एक्स्प्लोर

Nagpur : ॲट्रासिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांची विश्लेषणात्मक कारणमिमांसा शोधावी:विभागीय आयुक्त

गुन्ह्यांचे गांर्भीय लक्षात घेऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करुन प्रकरणांवरील स्थगिती उठविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. खोडे यांनी बैठकीत दिल्या.

नागपूर : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत दरवर्षी गुन्ह्यांत वाढ झालेली दिसून येते. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे फार आवश्यक आहे. त्यासाठी महसूल, पोलीस, सामाजिक न्याय व ग्रामविकास या चारही यंत्रणांनी या गुन्ह्यांचा वार्षिक कल लक्षात घेऊन त्याचे विश्लेषण करुन कारणमिमांसा शोधावी. त्यानुसार उपाययोजना आखून विहीत मुदतीत पीडितांना न्याय मिळवून द्यावा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज बैठकीत दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समिती सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विजयकुमार मगर, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख प्रत्यक्षरित्या तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक दूरदृश्यसंवाद प्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त म्हणाल्या की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 कायद्यांतर्गत विभागात 7 हजार 500 गुन्हे दाखल आहेत. यात न्यायप्रविष्ठ 6 हजार 670 प्रकरणे आहेत. ही संख्या जास्त आहे. यासंदर्भात न्यायालयात प्रलंबित व पोलीस तपासावर असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही होणे आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांचे गांर्भीय लक्षात घेऊन पीडितांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस व समाजकल्याण विभागाने नियमित पाठपुरावा करुन प्रकरणांवरील स्थगिती उठविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करावे.

अर्थसहाय्यासाठी प्रलंबित गुन्ह्यांच्या संदर्भात संबंधितांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. पिडितांना व पीडितांच्या वारसांना प्रतिमाह पाच हजार रुपये (महागाई भत्त्यासह) निवृत्ती वेतन देण्याची कार्यवाही सर्व जिल्ह्यांनी पूर्ण करावी. प्रत्येक जिल्ह्यानी दक्षता व नियंत्रण समितीची सभा दर महिन्याला नियमितपणे घ्यावी. वर्षभरात बारा सभा घेण्यात याव्या. उपविभागीय स्तरावरील समित्यांची दर तिमाही सभा होणे आवश्यक आहे. उपविभागीय समित्यांच्या सदस्यांना संवेदनशील व कायद्यासंदर्भात परिपूर्ण माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.

अनुसूचित जाती, अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांची माहिती, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, पोलीस तपासावरील गुन्हे, इतर लाभ दिलेल्यांची संख्या, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती आदी विषयावर सादरीकरणाच्या माध्यमातून यावेळी चर्चा करण्यात आली. जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे प्रसिध्दी करण्यात यावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha : प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून मनसेकडून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
Nirmala Sitharaman on Neet Paper Leak: 'अनेक विद्यार्थ्यांना नीट पेपरफुटीचा फायदा झाला, त्यांची कामगिरी सुधारली', निर्मला सीतारामन यांचा व्हिडीओ व्हायरल
'अनेक विद्यार्थ्यांना नीट पेपरफुटीचा फायदा झाला, त्यांची कामगिरी सुधारली', निर्मला सीतारामन यांचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Embed widget