एक्स्प्लोर

Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने

Pandharpur Development Project : पंढरपूर विकास कॉरिडॉरला काही स्थानिकांकडून विरोध होत आहे तर काही बाधितांकडून पुनर्वसनाच्या अटीवर त्याचं स्वागत करण्यात येत आहे.

सोलापूर : पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने 4130 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला अंतिम हिरवा कंदील मिळाला. आषाढी यात्रेनंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असून पुढील 30 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले आहे.

पंढरपूरमध्ये वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने आगामी 50 वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र मंदिर परिसरातील कॉरिडॉरला सुरुवातीपासूनच काहींकडून विरोध होत असून, आता हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Pandharpur Development Project : कॉरिडॉरला विरोध, पुनर्वसनावरून प्रश्नचिन्ह

कॉरिडॉरमुळे अनेक घरे, दुकाने, वाडे आणि मठ बाधित होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने अद्याप संपूर्ण आराखडा स्पष्टपणे मांडलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

काही विरोधकांनी हा प्रकल्प घाईघाईत राबवला जात असल्याची टीका करत सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पंढरपूरची पारंपरिक संस्कृती आणि वारकरी परंपरेला धोका निर्माण होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

Pandharpur Project Rehabilitation : बाधितांकडून अटीवर स्वागत

दुसरीकडे, अनेक व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी योग्य पुनर्वसन आणि मोबदला मिळाल्यास प्रकल्पाचे स्वागत करण्याची भूमिका घेतली आहे. घर आणि दुकाने जाणाऱ्या नागरिकांनी सरकारवर विश्वास व्यक्त करत पर्यायी जागा, भूखंड किंवा दुकाने देण्याची मागणी केली आहे. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, योग्य नियोजन आणि पारदर्शक पुनर्वसन प्रक्रिया राबवली तर हा प्रकल्प पंढरपूरच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल.

Pandharpur Development Timeline : 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन ऑगस्टपर्यंत संपादित करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि शहराचा विकास वेगाने होईल, असा सरकारचा दावा आहे.

Pandharpur Project Details : महत्त्वाची कामे आणि खर्च

या 4130 कोटींच्या प्रकल्पात विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे.

  • वारकरी सुविधा – 288.66 कोटी रुपये
  • मंदिर कॉरिडॉर – 579.27 कोटी रुपये
  • नदी घाट विकास व सुशोभीकरण – 443.39 कोटी रुपये
  • नगर प्रदक्षिणा मार्ग – 162.94 कोटी रुपये
  • शहर सुशोभीकरण – 480.50 कोटी रुपये
  • वाहनतळ आणि व्यापारी संकुल – 68.48 कोटी रुपये
  • पूल आणि हेलिपॅड – 127.60 कोटी रुपये
  • पालखीतळ विकास – 100 कोटी रुपये
  • भूसंपादन व पुनर्वसन – 2026.72 कोटी रुपये

Pandharpur Development Impact :  पुढील वाटचाल

हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून, यामुळे पंढरपूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र विरोधक आणि बाधित नागरिकांचे समाधान कसे केले जाते, यावर या प्रकल्पाचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget