एक्स्प्लोर

मटण खाऊन आलास, म्हणून भारत फायनलमध्ये हरला, लहान भावाची हत्या, महाराष्ट्र हादरला!

अमरावतीतल्या अंजनगाव बारीत धक्कादायक घटना घडली. वर्ल्डकप हरल्याच्या रागात मोठ्या भावानं सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे.

Amravati Crime News : टीम इंडियाचा (Team India) वर्ल्डकप फायनलमध्ये (ICC World Cup 2023 Final) पराभव झाला आणि देशातील 140 कोटी जनतेचा हिरमोड झाला. संपूर्ण देशाचे डोळे पाणावले. वर्ल्डकप सुरू झाल्यापासूनच फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा फायनलमधला परफॉरमन्स अनेकांना पचवताच आला नाही. वर्ल्डकप हरल्याच्या रागात अमरावतीत (Amravati) तर एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्ल्डकप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की, मोठ्या भावानं रागाच्या भरात स्वतःच्या सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे. 

आपणच वर्ल्डकप जिंकणार असा विश्वास असलेल्या प्रत्येकाचाच अपेक्षाभंग झाला आणि कांगारूंनी मोठ्या शिताफिनं टीम इंडियाकडून वर्ल्डकप हिसकावला. अनेकांना हा पराभव पचवणं कठिण गेलं. काही धायमोकलून रडले, तर काहींनी थेट गोंधळ घातला, कोणी टीव्ही फोडला, तर कोणी आदळआपट करुन राग काढला. अमरावतीत मात्र धक्कादायक प्रकार घडला. वर्ल्डकप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद विकोपाला गेल्यानं भावानंच भावाची हत्या केली.

अमरावतीतल्या अंजनगाव बारीत धक्कादायक घटना घडली. अमरावतीतल्या अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मटण खाऊन आले म्हणून भारत हरला, असं म्हणत दोन सख्ख्या भावाभावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मोठ्या भावानं सख्ख्या लहान भावावर लोखंडी सळईनं हल्ला केला. यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.                   

प्रकरण नेमकं काय?                      

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हा वर्ल्डकपचा अंतिम सामना आपण गमावला. तुम्ही मटण खाऊन आले म्हणूनच आपण हरलो, असं म्हणत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंजनगाव बारी येथे एका घरी वाद झाला. वादातून मोठ्या भावानं आपला सख्ख्या लहान भाऊ आणि वडिलांवर हल्ला केला. या मारहाणीत अंकित इंगोले (वय 28) याचा मृत्यू झाला तर वडील रमेश इंगोले गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी मोठ्या भावाला तात्काळ अटक केली आहे. दरम्यान, अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे, तर यात मोठा भाऊ प्रवीण यास पोलिसांनी अटक केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'त्याच्या' आठवणीत फायनलमध्ये हातावर काळी पट्टी बांधून खेळला मिचेल स्टार्क; ऐकाल तर तुमचेही डोळे पाणावतील!

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
 Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्र्यानंतर RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
Embed widget