Anil Bonde : इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली : अनिल बोंडे
Yashomati Thakur: इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली, असं बोंडे म्हणाले.
अमरावती : काँग्रेसनेत्या (Congress) आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर टीका करताना खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांची जीभ घसरली. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली, असं बोंडे म्हणाले. तसंच यांचा डीएनए हा इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा आहे, असंही ते म्हणाले.
अनिल बोंडे म्हणाले, इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ठाकुरांची पदवी मिळाली. इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा यांचा डिएनए आहे. काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधीचा आहे. भाजपचा डीएनए हा भारताचा आहे..
दानधर्म केल्याने "ठाकुर" ही पदवी दिल्याचा भटांचा दावा
यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडें यांना थेट भाटांकडील इतिहास दाखवून प्रतिउत्तर दिले आहे.1700 साली सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबांना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला "ठाकुर" ही पदवी दिल्याचा दावा यशोमती ठाकूर यांच्या घरी आलेल्या भाटांनी केला आहे.
यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर
यशोमती ठाकूर म्हणाल्या, सन 1700 मध्ये सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबाना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला "ठाकुर" ही पदवी देण्यात आली आहे. दुष्काळात आमच्या पूर्वजांनी दान केले त्यांच्या नोंदी आहेत. माझ्या पूर्वजांनी गरीबांना मदत केली हा इतिहास आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दंगली झाल्या आहे.खासदार म्हणून
त्यांना जे मूळ काम त्यांना करायचे आहेत ते करत नाही. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे.
भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच
भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच आहे. नथुराम गोडसे यांनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं, आणि स्वतः महात्मा गांधीना मारायचा प्रयत्न केला. संघ आणि भाजप सतत करत असतात. गांधी त्या युगातला असो की या युगातला असो गांधी गांधी आहे. या देशाचा मूळ डीएनए गांधी आहे. कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतो.. जी काही विकृती आहे ती विकृती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यांमध्ये आहे. ती विकृती नष्ट झाली पाहिजे यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे असा आमचा अट्टाहास आहे, असे काही दिवसांपूर्वी यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.