एक्स्प्लोर

Amravati News : 'जिल्हाधिकाऱ्यांनी दिली उद्धट वागणूक' ,अमरावतीमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या प्रहार संघटना आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आरोप

Amravati News : अमरावतीमध्ये सत्र्याच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यात संत्र्याच्या (Orange) मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या (Prahar) वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आमच्याशी उद्धटपणे वागल्याचं यावेळी प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. ज्यावेळी या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली त्यावेळी पोलिसांसोबत देखील या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी त्यापैकी पाच जणांना आतमध्ये सोडलं. पण त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला उद्धटपणे वागणूक दिल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. 

प्रहार संघटना आक्रमक

विदर्भातील मुख्य आर्थीक उत्पन्न देणाऱ्यांपैकी संत्र एक आहे. पण बदलेल्या हवामानामुळे आणि दरवर्षी होणाऱ्या फळगळतीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत सापडल्यांचं चित्र आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता बांग्लादेश सरकारने आयात शुल्क वाढ केल्याने संत्रा निर्यात जवळपास बंद झाली आहे. विदर्भातील संत्र्याकरीता बांगलादेश हा एकमेव आयात करणारा देश आहे. संत्रानिर्यात झाल्यास स्थानिक बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना संत्र्यासाठी चांगला दर मिळतो.  परंतु आता जवळपास निर्यात बंद झाल्याने स्थानिक बाजारपेठेत देखील संत्र्यांचे दर घटले आहेत. 

हवामानातील बदलांमुळे दरवर्षी सुरु असणारी वाढती फळगळ, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ यामुळे आधीच संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तेव्हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साखर निर्यातीला देण्यात येत असेलल्या अनुदानाच्या पार्श्वभूमीवर संत्रा निर्यातदारांना देखील अनुदान देण्यात यावे अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी सध्या करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. 

कोणत्या आहेत प्रमुख मागण्या?

बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यावरील निर्यात शुल्क हटविणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत संत्रा फळ पिकाचे वयोमर्यादेनुसार कोणतीही दोन वर्षात आंतर मशागतीसाठी अनुदान द्यावे, सोबतच सोयाबीन आणि मागील संत्रा फळाचे अनुदान मिळावे याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. 

 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन  माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मोठ्या सख्येनं कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत.  

हेही वाचा: 

Bacchu kadu : संत्रा उत्पादकांसाठी बच्चू कडूंचा 'प्रहार' रस्त्यावर, अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयावर धडक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget