एक्स्प्लोर
Amravati Crime : अमरावतीत मोठा शस्त्रसाठा जप्त; एकाच कुटुंबातील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन जणांना अटक
Amravati Crime : अमरावतीच्या दर्यापुरातील मोमीनपुरा भागातून एकाच कुटुंबातील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
Amravati Crime News : अमरावतीमध्ये शस्त्रसाठाप्रकरणी (Arms Stockpile) मोठी कारवाई करण्यात आली आहे. अमरावतीच्या दर्यापुरातील मोमीन पुरा भागातून एकाच कुटुंबातील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी 9 तलवारी, 3 फरशा, 1 गुप्ती आणि काही शस्त्र बनविण्याची साहित्य जप्त केली आहेत. दर्यापूर पोलिसांनी (Daryapur Police) ही मोठी कारवाई केली आहे.
जुन्या दर्यापूर (Daryapur) शहरात असलेल्या मोमीनपुरा या भागातून दर्यापूर पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकूण तीन जणांना अटक केली आहे. या परिसरात पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरु होतं.
पाहा व्हिडीओ : अमरावतीत दर्यापूरमधील मोमीनपुरा परिसरात मोठा शस्त्रसाठा जप्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
क्रीडा
बातम्या
Advertisement