(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Housefull 5 : प्रतीक्षा संपली! पुन्हा हशा पिकणार; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार खिलाडी कुमारचा 'हाऊसफुल 5'
Housefull 5 : अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Housefull 5 Release Date : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'हाऊसफुल 5' (Housefull 5) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'मिशन रानीगंज' या सिनेमाच्या यशानंतर खिलाडी आता 'हाऊसफुल 5' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. पण आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
'हाऊसफुल 5'ची चाहत्यांना प्रतीक्षा
'हाऊसफुल 5' हा सिनेमा 2024 मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा प्लॅन होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता अक्षय कुमारने या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. 2025 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. त्यामुळे 'हाऊसफुल'च्या चाहत्यांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
'हाऊसफुल्ल 5' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. खिलाडीने आता सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत निर्माते साजिद नाडियाडवाला यांचं एक स्टेटमेंटदेखील जाहीर केलं आहे. यात लिहिलेलं आहे,"हाऊसफुल फ्रेंचायझीचं यश प्रेक्षकांना माहिती आहे. आता 'हाऊसफुल्ल 5'ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा करतो.
View this post on Instagram
साजिद नाडियाडवाला यांनी पुढे लिहिलं आहे,"हाऊसफुल्ल 5' या सिनेमाचं कथानक चांगलं आहे. या सिनेमात वीएफएक्सतंत्राचाही वापर करण्यात आला आहे. 'हाऊसफुल्ल 5' हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल, अशी आशा करतो. याच कारणाने हा सिनेमा 6 जून 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल".
अक्षय कुमारने शेअर केलं 'हाऊसफुल्ल 5'चं पोस्टर (Akshay Kumar Shared Housefull 5 New Release Date)
अक्षय कुमारने पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"पाचव्यांदा मनोरंजनाचा धमाका करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 6 जून 2023 ला सिनेमागृहात भेटू". 'हाऊसफुल्ल 5' या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे. तरुण मनसुखानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'हाऊसफुल्ल 5' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट ते जाणून घेत आहेत.
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'हाऊसफुल्ल 5' (Housefull 5 New Release Date)
'हाऊसफुल्ल' हा सिनेमा 2010 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यानंतर 2012 मध्ये 'हाऊसफुल्ल 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 2016 मध्ये 'हाऊसफुल्ल 3' आणि 2019 मध्ये 'हाऊसफुल्ल 4' हे सिनेमे प्रदर्शित झाले. या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता 'हाऊसफुल्ल 5' या सिनेमाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 6 जून 2025 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.
संबंधित बातम्या