अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
![अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य Nana Patole Statement bjp mp Sanjay Dhotre on ventilator Akola Lok Sabha Constituency Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics Marathi News अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/45ddb8dccdff581c76019b8d995e4e2f1712247057431923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nana Patole : अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी सारवासारव करीत संजय धोत्रे हे माझे मित्र असल्याचे सांगितले. नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून आता वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अकोल्यात नाना पटोले आले असता त्यांनी हे वक्तव्य केले.
नाना पटोले म्हणाले की, सावित्रीबाई फुलेंचा कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) अपमान केला. एका मंत्र्यांच्या तोंडावर शाई फेकल्यावर पोलिसांना निलंबित केले गेले. हे लोक असेच करू शकतात. मी 2014 ते 2017 सालापर्यंत खासदार होतो. त्याकाळात नोटबंदी (Demonetisation) आणि जीएसटी (GST) आली, त्यावेळेस मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Prime Minister Narendra Modi) विरोध केला.
अकोल्याचे खासदार व्हेंटिलेटरवर
त्यावेळी अकोल्याचे (Akola) खासदार देखील होते. ते आता व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत. व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. पण निवडणुकीतच (Lok Sabha Election 2024) त्यांचा व्हेंटिलेटरवर काढतील, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. त्यावेळेस मी सर्व खासदारांसोबत नोटबंदी आणि जीएसटीचा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितले की, यातून तुम्ही लोकांचा पैसा घेणार आणि मुठभर लोकांकडे पोहोचवणार. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr Babasaheb Ambedkar) आर्थिक धोरण बदलवले जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. मात्र त्यानंतर नाना पटोले यांनी संजय धोत्रे (Sanjay Dhotre) हे माझे मित्र असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मग बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण?
डॉ. अभय पाटलांची (Dr Abhay Patil) उमेदवारी मागे घेणार आहेत, अशी हवा अकोल्यात उडवण्यात आली. 400 पार नाही 420 करायची आहे. आंबेडकरांनी शिरूरमध्ये दिलेल्या उमेदवाराचे आडनाव चुकीचे आहे. मी पण वंचित आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाबासाहेबांनी एका मिनिटात राजीनामा दिला. मग बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण? असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)