एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

" सॉरी मम्मी पप्पा”, UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या

परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक निवडणुकीवर प्रकाश टाकलाय. 

 अकोला : महाराष्ट्रातील पूजा खेडकर (Pooja khedkar)  प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) आणि कारभार सध्या देशभरात चर्चेचा विषय झालाय. दिल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची होत असलेली आर्थिक आणि मानसिक पिळवणूक सध्या चर्चेत आलीये. अकोल्यातील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण या दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने 21 जुलैला फाशी घेत आत्महत्या केली आहेय. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकलाय. परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक निवडणुकीवर प्रकाश टाकलाय. 

 अंजली अनिल गोपनारायण  तिनं‌ काही दिवसांपूर्वी बनवलेली ही रील  दिवा असलेली अधिकाऱ्याची गाडी हे तिचं स्वप्न होतंय... अंजली ही अकोल्यातील गंगानगर भागात राहतेय. पोलीस शिपाई असलेल्या वडिलांची मुलगी असणाऱ्या अंजलीनं सनदी अधिकारी होण्याचं स्वप्नं‌ पाहत दोन वर्षांपूर्वी दिल्ली गाठलीय... अधिकारी बनल्यानंतर अंबर दिव्याची गाडी घेऊन घरी यावं असं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतंय. मात्र, 23 जुलैला ॲम्बुलन्स गाडीतून आलेला मृतदेहच तिच्या कुटुंबीयांना पहावा लागलाय. 

भाड्याच्या खोलीत घेतली फाशी

21 जुलैला अंजलीने दिल्लीतील राहत असलेल्या जुने राजेंद्रनगर भागातील आपल्या भाड्याच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केलीय. अभ्यास आणि परीक्षेमुळे येणारा ताण-तणाव, सध्या या परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार, शिकवणी वर्ग वस्तीगृह आणि दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक यातून जीवन संपवलंय. आपल्या काळजाच्या तुकड्यांनं असा निर्णय घेतल्याने तिच्या कुटुंबियांची सर्व स्वप्न पार विरुन‌ गेली आहेत. 

अंजलीच्या 'सुसाईड नोट'मध्ये तिने नेमकं काय लिहिलंय?

 सुसाइड नोटमधून स्पष्ट होते की, त्या विद्यार्थिनीला किती मानसिक आणि आर्थिक ताणाचा सामना करावा लागत होता.  तिने आपल्या नोटमध्ये लिहिले की पीजी आणि होस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. सुसाइड नोटमध्ये तिने तिच्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. तिने सांगितले की तिने खूप प्रयत्न केले परंतु पुढे जाऊ शकली नाही. तिने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. तिचं एकच स्वप्न होता की, ती पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करेल. तिने तिच्या सर्व मित्र आणि कुटुंबियांना धन्यवाद दिले आहे, ज्यांनी तिला समर्थन दिले, पण तिला असे वाटत होते की ती असहाय्य आहे. 

हॉस्टेलचे भाडे अव्वाच्यासव्वा

सुसाईट नोटमध्ये तिने मावशीला धन्यवाद दिले आहे, ज्या नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सुसाइड नोटमध्ये एक स्माईल देखील काढली आहे आणि म्हटले आहे की तिला माहीत आहे की आत्महत्या हा कोणत्याही समस्येचे समाधान नाही.  तिने असेही लिहिले आहे की पीजी आणि होस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी सरकार आतातरी संवेदनशील होईल हीच माफक अपेक्षा

 केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना अभ्यासासाठी अतिशय चांगल्या सुविधा आणि वातावरण असणं आवश्यक आहेय. मात्र, दिल्लीत अलिकडे या विद्यार्थ्यांसंदर्भात घडलेल्या घटना या विद्यार्थ्यांसाठी अन सरकारसाठी अतिशय दुर्दैवी आहेय. या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेचं भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी सरकार आतातरी संवेदनशील होईल हीच माफक अपेक्षा.  

हे ही वाचा :

Pooja Khedkar: अशी ही बनवाबनवी! IAS होण्यासाठी पूजा खेडकरने 7 वेळा नावं बदलून परीक्षा दिली, वाचा सविस्तर रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
Embed widget