एक्स्प्लोर
राजकीय भूकंप घडवल्यानंतर रात्री उशिरा आपल्या घरी परतले अजित पवार
काल सकाळी कुणालाही खबर न लागता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, राष्ट्रवादी आणि त्यात पवार कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे. काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे आपले बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी होते.
मुंबई : काल दिवसभर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे रात्री उशिरा साडेबारा वाजता आपल्या घरी चर्चगेट परिसरातील प्रेम कोर्ट या अपार्टमेंटमध्ये पोहोचले. अजित पवार ज्यावेळी या अपार्टमेंटमध्ये पोहोचले त्यावेळी या परिसरात पूर्वीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . रात्री अजित पवार यांनी आपल्या घरीच विश्रांती घेतली. आज दिवसभरात त्यांच्या नेमक्या हालचाली काय असणार आहेत. ते कोणा कोणाला भेटणार आहेत. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या गोंधळात काल सकाळी अचानक धमाका झाला. काल सकाळी कुणालाही खबर न लागता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, राष्ट्रवादी आणि त्यात पवार कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे. काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे आपले बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी होते.
अजित पवार यांच्या तडकाफडकी निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी घेले होते. मात्र, त्यांना अजित पवारांची समजूत काढण्यात अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे. उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवारांनी शरद पवारांना आमदारांकरवी पाठवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे. या अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकारानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पूर्णपणे गोंधळलेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रावादीने संयुक्त परिषद घेत आपली भूमिका मांडली. यात अजित पवारांचा निर्णय हा वैयक्तीक असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी
पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भातील सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी बंडखोरी केल्यामुळे या पदावरुन त्यांना हटवले आहे.
संबंधित बातम्या -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement