एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार, भाजपचे नेते एकनाथ खडसे म्हणतात...

आज सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या विषयावर बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हे फारसे धक्कादायक नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याच्यासोबत आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडला. यावर बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हे फारसे धक्कादायक नसल्याचे म्हटले आहे. या नव्या सत्तासमीकरणावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, शिवसेनेने ही परिस्थिती ओढवून घेतली आहे. भाजप-सेनेच्या सरकारसाठी चर्चेतून तोडगा निघाला असता. शिवसेनेला अट्टाहास नडला असल्याचे खडसे म्हणाले. खडसे म्हणाले की, महाविकासआघाडीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाले असतील असं वाटत नाही. ज्या पद्धतीने अजित पवार त्यांच्यातून वेगळे झाले. एकमेकांवर विश्वास नव्हता म्हणून अजित पवारांनी वेगळे पाऊल उचलले. महाविकासआघाडीत नेते मनापासून एकत्र नव्हते. ते तत्वाने एकत्र नव्हते, शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिलेलं दिसतंय, असंही खडसे म्हणाले. ते म्हणाले की, आम्हाला सत्ता हवीय आणि भाजप नको असे म्हणत होणारी ही आघाडी फारशी टिकलीही नसती. यामध्ये शिवसेनेची सर्वात मोठी गोची झाली आहे. सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे, असेही खडसे म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते काहीही करून राज्याला स्थिर सरकार देतील असा विश्वास होता, असे खडसे म्हणाले. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तर भाजपला संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे की, अजित पवारांसोबत आमदारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज्यात एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार असं वाटत असतानातच, भाजपने राजकारणात मोठा भूकंप घडवला. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा मांडण्यास तयार झाली. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत सहमती देखील झाली. परंतु आज सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला.

महत्त्वाच्या बातम्या

या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
ABP Majha Top 10, 12 October 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 12 October 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Dharashiv: आधी बाचाबाची, नंतर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांना शटर बंद करून पोलिसांची मारहाण? तुळजापुरात नेमकं काय घडलं?
आधी बाचाबाची, नंतर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांना शटर बंद करून पोलिसांची मारहाण? तुळजापुरात नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Embed widget