एक्स्प्लोर

अजित पवारांनी 54 आमदारांची यादी दाखवून फसवणूक केली : शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप घडला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, राजभवनात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचं कथन केलं.

मुंबई : अजित पवारांनी 54 आमदारांची यादी राज्यपालांना दाखवून फसवणूक केली. परंतु भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही. मात्र त्यानंतर आम्ही तीन पक्ष मिळून सत्ता स्थापन करु. कुठलंही संकट आलं तरी आम्ही तिघे एकत्रच राहणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप घडला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, राजभवनात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचं कथन केलं. तसंच जे अजित पवारांसोबत राजभवनावर गेले, अजून काही त्यांच्यासोबत जाणार असतील, त्यांनी लक्षात ठेवावं पक्षांतरबंदीचा कायदा लागू होतो, असा इशाराही शरद पवारांनी दिला. नाव आणि स्वाक्षरीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांची यादी कार्यालयात ठेवली होती. अजित पवारांनी ती यादी घेतली आणि राजभवनावर गेले. ती यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केली. त्यांच्यासोबत 10 ते 11 आमदार होते, असा दावा शरद पवारांनी सांगितलं. यानंतर अजित पवारांसोबत राजभवनात गेलेल्या आमदारांनाही पत्रकार परिषदेत बोलावून तिथे काय घडलं याची माहिती देण्यास सांगितलं. अजित पवारांनी आपल्याला राजभवनात का नेलं याची कोणतीही कल्पना नसल्याचं आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर, भुसारा यांनी सांगितलं. अजित पवारांचा निर्णय भाजपच्या धोरणाविरोधात शरद पवारांनी सांगितलं की, "शनिवारी बैठक झाल्यावर काही गोष्टी घडल्या. मला एक सहकाऱ्याने कळवलं की आम्हाला राजभवनावर आणलं आहे. मला आश्चर्य वाटलं की राज्यपाल सकाळी साडेसहा वाजता आहे. नंतर समजलं की,  अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काही सदस्य राजभवनावर गेले. हा निर्णय अजित पवारांचा आहे, आमच्या धोरणाविरोधात आहे. राष्ट्रवादी विधीमंडळ नेता असो किंवा कोणताही कार्यकर्ता तो भाजपसोबत जाणार नाही, याचा मला विश्वास आहे. जे सदस्य गेले, त्यांना पूर्ण माहिती असावी, असं मला वाटतं. जे सदस्य गेले किंवा जाणार असतील त्यांना दोन गोष्टी माहित असतील. एकतर पक्षांतर बंदी कायद्यातील तरतूदी लागू होऊन सदस्यत्व जाईल. महाराष्ट्रातील जनमानस भाजपबरोबर सरकार बनवण्यासाठी तयार नाही. त्यामुळे जर कोणी निर्णय घेतला तर त्यांच्या मतदारसंघातील जनता पाठिंबा देणार नाही. सदसत्वाचा राजीनामा दिला आणि निवडणूक झाली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांना पराभव करतील."

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget