'शक्य तितक्या लवकर 100 शवपेट्या बनवा!' एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचा नेमका फोन कुणाला? अहोरात्र लागले लोक कामाला
अहमदाबाद विमान अपघातानंतर मृतांचे मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यासाठी लागणाऱ्या शवपेटीसाठी एअर इंडियाने वडोदरा येथील एका शवपेटी निर्मात्याला 100 शवपेटी बनवण्याचा ऑर्डर दिल्याची माहिती पुढे आलीय.

Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या दुर्घटनेत 267 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि आता मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना पाठवण्याची तयारी सुरू आहे. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कॉलेजमधील शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक डॉ. रजनीश पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एअर इंडिया विमान अपघातात (Air India Plane Crash) मृत्युमुखी पडलेल्याचे मृतदेह डीएनए चाचणीद्वारे ओळखले आहेत आणि ते मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र डीएनए जुळवण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक केली पाहिजे. त्याचे कायदेशीर आणि वैद्यकीय परिणाम आहेत, त्यामुळे ते करण्याची घाई करता येणार नसून पूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पार पडल्यानंतर मृतदेह पीडित कुटुंबियांना दिली जातील, असेही ते म्हणाले.
"शक्य तितक्या लवकर 100 शवपेट्या बनवा!
अशातच ही प्रक्रिया पार पडत असताना मृतांचे मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यासाठी लागणाऱ्या शवपेटीसाठी एअर इंडियाने वडोदरा येथील एका शवपेटी निर्मात्याला 100 शवपेटी बनवण्याचा ऑर्डर दिला आहे, त्यापैकी 25 शवपेटीका शनिवारी अहमदाबादला पाठवल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.
वडोदरा येथील शवपेटी बनवणारे नेल्विन राजवाडी यांनी पत्रकारांना सांगितले की, "13 जून रोजी रात्री 8.30 वाजता मला एअर इंडियाच्या व्यवस्थापकाचा फोन आला. कोणीतरी त्यांना माझा नंबर दिला होता. त्यांनी सांगितले की त्यांना 100 शवपेटींची आवश्यकता आहे. मी सांगितले की इतक्या शवपेटी लगेच बनवणे कठीण आहे, पण आम्ही हे काम सुरू केले."
एवढ्या मोठ्या प्रमाणात शवपेट्या बनवणं खूपच कठीण होतं, पण...
त्यांनी पुढे सांगितलं की, “आज (शनिवारी) सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही जमलो आहोत आणि घरीही गेलो नाही. मेथोडिस्ट चर्चच्या फादरने आम्हाला जागा दिली आणि शवपेटी बनवण्यासाठी सर्व साहित्य दिले, ज्यात पांढऱ्या कापडाचाही समावेश होता.
पुढे ते म्हणाले की, “मी हे काम गेल्या 30 वर्षांपासून करत आहे आणि अखिल भारतीय रुग्णवाहिका सेवा देखील चालवतो. प्लीहाचा त्रास पाच दिवस टिकतो, तर कल्पना करा की या अपघातात कुटुंबांना काय सहन करावे लागले असेल. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात शवपेट्या बनवणं खूपच कठीण होतं, पण वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही थांबलोच नाही. काम तातडीने सुरू केलं." असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























