एक्स्प्लोर

Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना

Death in Drowning Lake : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यात गणपती विसर्जना दरम्यान 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

Death in Drowning Lake : गणपती विसर्जनादरम्यान (Ganesh Visarjan) अनेक ठिकाणी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी तलावात बुडून मृत्यू (Death in Drowning Lake) झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. गणपती विसर्जना दरम्यान 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव इथं ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरुन तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृत युवकांची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आहे.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.

नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू

नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी पाण्यात उतरले असता दोघेही एका खड्ड्यात पडले. मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिकच्या पार्थर्डी फाटा परिसरात ही घटना घडली. घरातील तरुण मुलांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून दोघेही जिवलग मित्र होती. ओंकार हा केटीएचएम महाविद्यालयात शिकत होता. तर, स्वयंम हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. ओंकार आणि स्वयंम काल संध्याकाळी मित्रांसोबत वालदेवी नदीत गणपती विसर्जनासाठी गेले. त्यावेळी नदीपात्रातील एका खड्ड्यात ते पडले. पाण्यातून बाहेर येता न आल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

अमरावती जिल्ह्यात तीन तरुण गणेशभक्तावर काळाचा घाला

गणपती विसर्जना दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तीन तरुण गणेशभक्तावर काळाने घाला घातला. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील पूर्णा नदीत अचलपूर तालुक्यातील 2 युवक तर दर्यापूर तालुक्यातील 1 युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. नदीत वाहून गेलेल्या गणेश भक्तांचा सध्या शोध सुरू आहे. मयूर गजानन ठाकरे (वय 28), अमोल विनायक ठाकरे (वय 40, राहणार ईसापुर) आणि दारापूर येथील राजेश पवार असे वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Nagpur News : तलावात पोहण्याचा मोह बेतला तिघांच्या जीवावर; तर वर्ध्यात पहिल्याच दिवशी जलतरण तलावात बुडून बालकाचा दुर्दैवी अंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Embed widget