एक्स्प्लोर

Ahmednagar News : परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार; बनावट सह्या आणि कागदपत्रांच्या आधारे वाहन परस्पर हस्तांतरित

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर परिवहन विभागाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

श्रीरामपूर, अहमदनगर:  परिवहन कार्यालयातून एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे वाहन परस्पर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर झाल्यास यात आश्चर्य वाटायला नको. असाच धक्कादायक प्रकार अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर परिवहन विभागात (Shrirampur RTO Office) समोर आला आहे. तक्रारदाराला सत्य समजल्यावर त्याने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. या सगळ्या प्रकारामुळे श्रीरामपूर परिवहन विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

संगमनेर तालुक्यातील अश्वी येथील गौतम गायकवाड यांनी एका खाजगी फायनान्स कंपनीकडून चार लाख 55 हजार वाहन कर्ज घेऊन मारुती वॅगनर गाडी घेतली होती. कर्जाचे नियमित हप्ते फेडत गायकवाड यांनी दोन लाख 30 हजार रुपये देखील भरले. मात्र कोविड काळात दोन हप्ते थकल्याने त्या संदर्भात पत्र व्यवहार करून नाशिक कार्यालयात गेले असता 21 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीने मार्च 2022 मध्ये जयपूर येथे सुनावणीस हजर राहण्याचे पत्र दिल्याने तेथून परतत होते. त्याच वेळेस द्वारका सर्कल नाशिक येथे फायनान्स रिकव्हरी एजन्सीच्या लोकांनी गायकवाड यांच्या मालकीची एमएच 17 बीएक्स 6009 क्रमांकाची गाडी न्यायालयीन प्रकरण असतानाही गोडाऊनला लावून घेतली.  

या संदर्भात फायनान्स कंपनी आणि रिकव्हरी एजन्सीकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळ काढला.  मात्र जेव्हा गायकवाड यांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर तपासणी केली असता वाहनाचे मूळ आरसी बुक स्वतःकडे असतांना देखील श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील काही दलाल आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून  कोणतीही मागणी केलेली नसताना बेकायदेशीर खोट्या सह्या, बनावट व्यक्ती आणि गायकवाड यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड जोडून अहमद रसूल पटेल या इसमाच्या नावे गाडी हस्तांतरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान याविषयी परिवहन विभागाशी संपर्क साधला असता एकही अधिकारी बोलायला तयार झाली. माजी परिवहन मंत्री आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी मात्र परिवहन विभागाच्या कामकाजात आमूलाग्र बदल करणे गरजेचे असलायच स्पष्ट केले आहे. परिवहन विभागाला दलालांचा विळखा पडला असून परिवहन विभागाने कामकाजात बदल करणे गरजेचं असल्याचे सांगितलंय. मात्र,  असा प्रकार याआधी किती जणांसोबत झालाय, किती जणांना अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडावं लागले असेल, याचीही चर्चा सुरू आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्यJalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीकाBar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Nylon Manja : धक्कादायक... नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Embed widget