एक्स्प्लोर

सुरेश धसांकडे धनंजय मुंडेंबाबत काही पुरावे असतील तर ते मुख्यमंत्री आणि SIT कडे द्यावेत : राधाकृष्ण विखे पाटील

मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केलेला आरोपाचा नेमका काय संदर्भ आहे? हे मला माहिती नाही असे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केलेला आरोपाचा नेमका काय संदर्भ आहे? हे मला माहिती नाही. मात्र त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत मत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. हे पुरावे एसआयटीला देता येतील असंही विखे पाटील म्हणाले. मस्साजोग प्रकरणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय मोर्चामध्ये बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. धनंजय मुंडे यांच्याच सरकारी बंगल्यावर तीन कोटी रुपयांची डिल झाल्याचे वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होते. याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली.

आमच्यासाठी शिर्डीकरांच्या भावना महत्त्वाच्या

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई साई संस्थानकडून दिल्या जाणाऱ्या मोफत भोजनाला विरोध केला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र सुजय विखे यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटल आहे. सुजय विखेंच्या या भूमिकेचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील समर्थन केल आहे. साई संस्थानकडून दिल्या जाणाऱ्या मोफत भोजनामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत शिर्डीकरांच्या भूमिका महत्त्वाची असून त्या ठिकाणी जाऊन याबाबत विचार करायला हवा. कारण भिक्षेकरांच्या उपद्रवामुळे नागरिकांना त्रास होतो. डॉक्टर सुजय विखे यांनी कोणत्याही साई भक्तांना उद्देशून म्हटलेलं नाही, तसा गैररसमज केला जात आहे. आमच्यासाठी शिर्डी येथील नागरिकांच्या भावना महत्वाच्या आहेत असं विखे पाटील म्हणाले. त्यामुळं कोणाला यावर काय म्हणायचं ते म्हणू द्या असं विखे पाटील म्हणाले.

राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ

राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. यासंदर्भात गाळ काढण्याच्या सूचना दिल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील मोठ्या धरणामध्ये गाळ साचला असून याआधी काही निर्णय झाले आहे का? त्याची लवकरच माहिती घेऊ असं राधाकृष्ण विखेंनी म्हंटल आहे. धरणातील गाळ काढण्यासंदर्भामध्ये स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल

मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाले आहे. मात्र अद्यापही पालकमंत्री निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून तिढा असल्याच्या राजकीय चर्चा रंगत आहेत. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल. शेवटी तीन पक्षाचे सरकार आहे. हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळं सर्वांचा विचार घेऊनच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal PC : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, छगन भुजबळ स्पष्टच बोलले..HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
Embed widget