एक्स्प्लोर

Shirdi Ram Navami Utsav : दहीहंडी फोडून शिर्डीतील रामनवमी उत्सवाची सांगता, तीन दिवसात लाखो भाविकांकडून साईंचं दर्शन

Shirdi Ram Navami Utsav : साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा करण्यात आला. या तीन दिवसात लाखो भाविकांनी साईदर्शनाला हजेरी लावली.

Shirdi Ram Navami Utsav : साईबाबांच्या (Sai Baba) शिर्डीत (Shirdi) रामनवमी (Ram Navami 2023) उत्सव तीन दिवस साजरा करण्यात आला. या तीन दिवसात लाखो भाविकांनी साईदर्शनाला हजेरी लावली. तीन दिवसीय उत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच आज (31 मार्च) सकाळी गुरुस्‍थान मंदिरात जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला. तर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी साईबाबांची पाद्यपूजा केली. दुपारी विक्रम महाराज नांदेडकर यांच्‍या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी (Dahi Handi) फोडण्यात आली. साईमंदिरात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता करण्यात आली.

रामनवमीला साई मंदिर रात्रभर खुले

दरम्यान साईबाबा यांच्या परवानगीने 1911 साली सुरु झालेला रामनवमी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. 29 मार्चपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला होता. उत्सवाच्या पहिल्या साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. या उत्सवाच्या काळातील तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. तर काल (30 मार्च) रामनवमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आलं होतं. राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतला होता.

साई मंदिरात विद्युत रोषणाई, फुलांची सजावट

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील राज्यभरातून शेकडो पायी पालख्या घेऊन साईभक्त शिर्डीमध्ये दाखल झाले होते. तसेच राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले असून साईमंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रामनवमी उत्‍सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात अमेरिकेतील दानशूर साईभक्‍त श्रीमती शोभा पै यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली होती. तर मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई तसंच प्रवेशद्वारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आला होता.

उत्सव काळात शिर्डीमध्ये रेलचेल

साईबाबा हयात असताना हा उत्सव मोठा उत्साहाने साजरा करत होते. आजही साईसंस्थान आणि गावकरी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसात अनेक कार्यक्रमाची रेलचेल शिर्डीत असते. पंढरपूरप्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. यंदाही राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या. साईनामाचा गजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाला मोठी रंगत आली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Wife Kalpana Kharat: सिन्नरच्या पाडळी गावाची लेक ते कोट्यवधींच्या फसवणुकीची आरोपी, भोंदू खरातची पत्नी जामिनासाठी न्यायालयाच्या उंबरठ्यावर, कोण आहे कल्पना खरात?
सिन्नरच्या पाडळी गावाची लेक ते कोट्यवधींच्या फसवणुकीची आरोपी, भोंदू खरातची पत्नी जामिनासाठी न्यायालयाच्या उंबरठ्यावर, कोण आहे कल्पना खरात?
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Ashok Kharat : 2022 साली साई संस्थानच्या कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, आधी चार्जशिटमधून नाव वगळलं, आता पुन्हा तपासाचे आदेश, खरातचे पाय आणखी खोलात
2022 साली साई संस्थानच्या कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, आधी चार्जशिटमधून नाव वगळलं, आता पुन्हा तपासाचे आदेश, खरातचे पाय आणखी खोलात
Ashok Kharat : खरातचे पाप, गुन्हे अमाप! अशोक खरातविरोधात तक्रारींची संख्या वाढली, आणखी 11 महिला भोंदूच्या विरोधात उभ्या
खरातचे पाप, गुन्हे अमाप! अशोक खरातविरोधात तक्रारींची संख्या वाढली, आणखी 11 महिला भोंदूच्या विरोधात उभ्या

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget