एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Rohit Pawar on Maratha Reservation : मराठा समाजाची लोकसंख्या 28 टक्के असताना आरक्षण 10 टक्केचं का दिले? रोहित पवारांचा संतप्त सवाल

Rohit Pawar on Maratha Reservation : राज्य सरकारने  मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Rohit Pawar on Maratha Reservation : राज्य सरकारने  मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज (दि.20) मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाबाबत सवाल केले आहेत. ते कर्जत येथे बोलत होते. 

'भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी करत' 

राज्यात मराठा लोकसंख्या 28 टक्के असताना सरकारने 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) कसे दिले, असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं गेलं. त्यानंतर भाजप सरकारकडून 13 टक्के आरक्षण दिलं गेलं आणि आता दहा टक्के आरक्षण दिलं गेलं आहे. म्हणजेच भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत. 

पंतप्रधान मोदींकडे मराठा आरक्षणवर बोलण्याचे धाडस नाही

रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले, ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र जे पण आरक्षण दिलं जात आहे हे टिकलं पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून मराठा समाजाला दोन महिन्यापूर्वीच आरक्षण दिलं गेलं असतं. यासोबतच धनगर समाजाला, लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षण दिले गेले पाहिजे. पंतप्रधान मोदी राज्यात येतात मात्र या नेत्यांमध्ये त्यांच्याशी या विषयावर बोलण्याचं धाडस नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

जरांगे-पाटीलांकडूनही आक्षेप 

करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच आहोत. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या हक्काचं ओबीसीमधील आरक्षण (OBC Reservation) आम्हाला हवे आहे.  आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. याला आमचा सक्त विरोध आहे.  सध्या कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात येत आहेत. यात बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत.  असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

'मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय, आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये'; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget