Prakash Shendge : "...म्हणजे मनोज जरांगेंना पितामहची पदवी मिळेल"; प्रकाश शेंडगेंचा टोला
Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावला आहे.
Prakash Shendge on Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावला आहे. मनोज जरांगे यांनी आता असे एक उपोषण केलं पाहिजे की, उभ्या भारतातल्या शेतकऱ्यांना कुणबी दाखले द्या. म्हणजे संपूर्ण देश हा कुणबीमध्ये (Kunbi) जाईल आणि मनोज जरांगे यांना पितामहची डिग्री मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. अहमदनगर (Ahmednagar) येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मराठा समाजाच्या काही युवकांकडून ओबीसी समाजाच्या व्यावसायिकांवरती बहिष्कार घालण्याची भाषा केली जात आहे. मात्र, देशातील न्हावी समाजाने जर मराठा समाजावर बहिष्कार घातला तर यांना डोक्यातील उवा मारत बसाव्या लागतील. त्यामुळे मराठा समाजाने बहिष्काराची भाषा करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. याबाबत आमदार प्रकाश शेंडगे यांनी म्हटले की, आम्ही भुजबळ साहेब यांना राजीनामा देऊ नका, अशी विनंती केली आहे. मंत्रिमंडळात राहून हा लढा आपण दिला पाहिजे. ते ओबीसींचे (OBC) नेते आहेत, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून प्रकाश शेंडगे कडाडले
2024 ला संजय गायकवाडला लाथा घाला. 2024 मध्ये ओबीसी मुख्यमंत्री आणा. बहुजनांचे सरकार आणा. यांच्या घरात मुलं जन्माला आले तरी ते आमदार, खासदार होऊन जन्माला येतात. मराठ्यांचा आता सरपंचही होणार नाही, आमदार खासदार तर दूरचीच गोष्ट आहे. आता एकही निवडणूक (Election) सोडायची नाही. सर्व आपण जिंकायच्या आहेत. बोगस कुणबी आरक्षण घेतले जात आहे. न्यायालयातील लढाई, रस्त्यावरील आणि राजकीय अशा तीन लढाई आपल्याला लढायच्या आहेत, असे शनिवारी झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात प्रकाश शेंडगे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने जरांगेंची फसवणूक केली की मराठा समाजाची याचे उत्तर द्यावे. आता सर्वेक्षण सुरू आहे, खोटी माहिती दिली जात आहे. माहिती खोटी दिली तरी आधार कार्ड नंबर खरा दिला आहे. त्यात बँक खाते लिंक आहे. जी खोटी माहिती दिली त्यावर आणि लिहून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या