एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

'मला 100 टक्के विश्वास, दोन लाखांच्या फरकाने जिंकणार', निलेश लंकेंनी स्वत:चा एक्झिट पोल सांगितला!

Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठा दावा केला आहे. तब्बल दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार, असे त्यांनी म्हटले आहे. 

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll) हे काही तासात समोर येणार आहेत. तर चार जूनला निकाल लागणार आहे.  या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मोठा दावा केला आहे. तब्बल दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार, असे त्यांनी म्हटले आहे. 

मला 100 टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे. 

निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला 

इतर उमेदवारांसारखे आपले आकडे कमी होत नाहीत, तर वाढतच आहेत. कारण सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे असं म्हणत निलेश लंके यांनी अप्रत्यक्षरीत्या त्यांनी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना टोला लगावलाय. निवडणूक झाल्याबरोबर आपण इतरांप्रमाणे आराम करण्यासाठी कुठे गेलो नसून जनतेसोबत असल्याचं म्हणत माझं दैनंदिन काम सध्या देखील सुरू असल्याचं त्यांनी म्हटल आहे.

विखेंकडून प्रशासनाचा गैरवापर : निलेश लंके 

काही दिवसांपूर्वी सुपा एमआयडीसी परिसरात जी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली ती सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे नाव न घेता त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचे निलेश लंके यांनी म्हटले आहे. मात्र गोरगरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून त्यांनी काय मिळवलं? विखेंकडून प्रशासनाचा कसा गैरवापर करण्यात आला. हे चार तारखेनंतर सर्वांसमोर सांगू,असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मंगळवार दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

पंतप्रधान मोदींमुळे सुजय विखे निवडून येणार पण, मताधिक्य मात्र...; भाजपच्या राम शिंदेंनी केला दावा

Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरला स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न, निलेश लंकेंच्या आरोपावर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Maharashtra Exit Polls Result 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uttam Jankar on Ajit Pawar : अजित पवार 40 हजार मतांनी पडणार! उत्तम जानकर यांनी केलं भाकित...Sharad Koli on Praniti Shinde : केसाने गळा कापला,खंजीर खुपसला, प्रणिती शिंदेंवर शरद कोळी संतापलेNitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 20 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Maharashtra Exit Polls Result 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Satara Voting Percentage : साताऱ्यातील आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती, कराड दक्षिण, कराड उत्तरसह पाटणला जोरदार मतदान
साताऱ्यात कराड उत्तर, कराड दक्षिण सह पाटणमध्ये सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठं? जाणून घ्या आकडेवारी
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
Embed widget