Lok Sabha 2024 : मराठे लोकसभेच्या रिंगणात! नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार उभे करणार, जरांगेंचा इशारा
Ahmednagar South Lok Sabha Constituency : अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार उभे करणार, अशी माहिती मराठा समन्वयक राम जरांगे यांनी दिली आहे.
Maharashtra Political News : अहमदनगर : सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात (Ahmednagar South Lok Sabha Constituency) लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) सातशे ते आठशे मराठा उमेदवार (Maratha Candidates) अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समन्वयक राम जरांगे यांनी दिली आहे. त्या संदर्भात तयारी सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. तर आत्तापर्यंत पाचशे जणांची तयारी झाल्याचं बोललं जातं आहे. आतापर्यंत सर्वाधिकार जामखेड येथे 104 जणांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. तर श्रीगोंदा 38, कर्जत 12, नगर तालुका 54, नगर शहर 55, पाथर्डी 48, पारनेर 29 जणांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः डिपॉझिट भरून हे उमेदवार उभे राहणार असल्याचे राम जरांगे यांनी सांगितलं आहे.
लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार उभे करणार
तसेच, प्रत्येक गावातून जास्तीत जास्त 4 तर कमीत कमी 2 मराठा उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर मोठे डोकेदुखी ठरणार आहे, यातून काय मार्ग काढला जातो हे पाहणं महत्वाच असणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) समर्थक हे आक्रमक झाले असून सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी आता लोकसभा निवडणुकीत देखील शुद्ध ठोकल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे.