एक्स्प्लोर

जलील म्हणतात कालीचरण महाराज जेलमध्ये जाणार; तर हाती चले बजार..., कालीचरण महाराजांचं प्रत्युत्तर

Imtiyaz Jaleel Vs  Kalicharan Maharaj : इम्तियाज जलील आणि कालीचरण महाराज यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

Imtiyaz Jaleel Vs  Kalicharan Maharaj : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार तथा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) आणि कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. जलील आणि कालीचरण महाराज दोन्ही अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे.  कालीचरण महाराज लवकरच जेलमध्ये जाणार असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली होती. तर त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना, "हाती चले बजार, कुत्ते भोंके हजार" असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे इम्तियाज जलील विरुद्ध कालीचरण महाराज असा नवा वाद पाहायला मिळत आहे. 

इम्तियाज जलील यांची टीका...

अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, कोणीपण भगवा कपडा घालून महाराज होण्याचा प्रयत्न करतोय पण तसे होत नाही. अनेक गुन्हेगार भगवे कपडे घालून स्वतःला स्वामी म्हणून घेण्याला सुरुवात केली आहे. काही महाराज तोंड उघडलं की विष ओकतात. आसारामबापू यांचे किती चाहते होते. ते आल्यावर लाखो लोकं त्यांच्या मागे असायचे, पण आज ते जेलमध्ये आहेत. कालीचरण महाराज देखील किती दिवस बाहेर असतील मला माहित नाही, पण अशाप्रकारे असलेल्या महाराजांची जागा जेलमध्ये असणार आहे. मात्र जेव्हा पोलीस, सरकार , प्रशासन सक्तीने कायद्याचा वापर करतील त्यावेळी हे सर्व काही शक्य आहे. तसेच कालीचरण महाराज यांच्या भाषेत आम्ही देखील उत्तर देऊ शकतो, असेही जलील म्हणाले. 

कालीचरण महाराज यांचे प्रत्युत्तर...

दरम्यान, जलील यांच्या टीकेला कालीचरण महाराज यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. "मला काय देणघेणं या लोकांशी. मी तुकडा टाकला की, लगेच भूकंतात. हाती चले बजार, कुत्ते भोंके हजार या नीतीने आम्ही चालत राहतो. कोणी निंदा कोणी मिंदा, आमचा सत्य सांगण्याचा धंदा असे कालीचरण म्हणाले. त्यामुळे जलील आणि कालीचरण महाराज यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. 

आमदार-खासदारांनी पीन मारल्याने माझ्यावर गुन्हा दाखल 

पुढे बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल सहा महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. काही आमदार-खासदार यांनी पोलिसांवर दबाव आणला आणि त्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला. पण जन्मभर आम्ही जेलात राहण्यासाठी तयार आहोत, आम्ही मरायला तयार आहोत. तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही काहीही करायला तयार असल्याचं कालीचरण म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

राज्यातील सर्व भाजप खासदारांना 30 जूनपर्यंत मतदारसंघात राहण्याच्या सूचना; कर्नाटकातील दारुण पराभवानंतर निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget