एक्स्प्लोर

अंगावरील साडी नदीत फेकली, बुडणाऱ्या दोघांना वाचवलं, कोपरगावच्या जिगरबाज ताईबाईंची कहाणी

Kopargaon Tarabai Rescue 2 Man : गोदावरी नदीत तिघे वाहून जात असल्याचं पाहून ताराबाईंनी अंगावरी साडी नदीत फेकून त्यापैकी दोघांना जीवनदान दिलं आहे.

Kopargaon Taibai Rescue 2 Man :  तिघांना बुडताना पाहून माऊलीने अंगावरील साडी फेडली अन् बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. स्वत:च्या जीवाची बाजी लावून या माऊलीने दोघांना जीवनदान दिलय. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतय. ताईबाई छबुराव पवार (Tarabai Pawar) असं या माऊलीचं नाव आहे असून त्या कोपरगावच्या रहिवासी आहेत

ताईबाई छबुराव पवार या शेती करतात. ताईबाई आणि त्यांचे पती छबुराव त्यांनी केलेल्या धाडसी कृतीमुळे सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. मागील आठवड्यात राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. परिणामी नद्या दुथडी भरुन वाहत होत्या.धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला देखील पूर आला होता. अशातच तीघे जण आपल्या नदी काठी लावलेल्या मोटारी काढण्यासाठी आले होते. तिघं सख्खे भाऊ होते. गोदावरी नदीची नदी पातळी कमालीची होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं तिखे भाऊ नदीच्या पात्रात पडले. तिघांची जीव-मरणाची लढाई सुरु होती. जीव वाचवण्यासाठी तिघं जोरजोरात ओरढत होते..कुणी तरी आपल्याला वाचवेल अशी आस त्यांना होती.

ताईबाई आणि त्यांचे पती छबुराव हे दोघं जेवण करत बसले होते. दरम्यान त्यांना नदीच्या दिशेने तिघं वाहून जाताना दिसली. तिघं जीव वाचवण्यासाठी जोरजोरात हाका मरत होते. हाक ऐकताच ताईबाईंनी हातातली भाकरी सोडून नदीकडे धाव घेतली. त्यांना समोर तिघं जण वाहून जाताना दिसले. ताईबाई आणि छबुराव, दोघं नदीच्या प्रवाहाच्या दिशेने धावत होते. 

बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी ताईबाई आजुबाजूला सामग्री शोधत होत्या मात्र त्यांना काही सापडलं नाही. ताईबाईंनी कसली ही परवा न करता आपल्या अंगावरील साडी फेडली. ती साडी त्यांनी नदीतून वाहून जाणाऱ्या भावांकडे फेकली. बुडणाऱ्यांना थोडासा आधार मिळाला. दोन भावांनी साडीला घट्ट पकडलं अ्न ताईबाई आणि छबुरावांनी दोघांना वर ओढलं..तीन भावांपैकी दोघं थोडक्यात बचावलले. मात्र एक भाऊ गोदावरीत वाहून गेला..

संतोष भिमाशंकर तांगतोडे वय (25 वर्ष), अमोल भिमाशंकर तांगतोडे  (वय 30) वर्ष आणि प्रदिप भिमाशंकर तांगतोडे वय (28 वर्ष) असं या सख्ख्या भावांचं नावे आहेत. हे तिघे सख्खे भाऊ मोटारी काढण्यासाठी गेले असता त्यांचासोबत हा अपघात घडला. या घटनेत दोघं बचावले पण संतोष तांगतोडे हा खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवण्यात अपयश आलं..

दरम्यान, वेळप्रसंगी पवार दाम्पत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसाने दोघांना जीवनदान दिलय. लवकरच ताईबाईंना शबरीमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
IND vs AUS : 224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने  सामने येणार
224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार
Afghanistan: तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
Diwali 2025 : होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी
होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Modern College: कॉलेजकडून आडकाठी, इंग्लंडमधील नोकरी गेली, काय आहे प्रकरण?
Voter List : मतदार याद्यांमध्ये घोळ? सत्ताधारीच आक्रमक, 48 तासांत दुबार नावं हटतील
Election Vote List Scam : आरोपांच्या फैरी चौकशीची तयारी, मतदार यादीत घोळ?
Maharashtra Politics: दोन ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडणार, ठाण्यात ठाकरे बंधूंचा झेंडा फडकणार?
Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
IND vs AUS : 224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने  सामने येणार
224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार
Afghanistan: तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
Diwali 2025 : होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी
होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
''पंडीत नथुराम गोडसेच्या विचारांसाठी आनंद दिघे कोर्टात लढले, म्हणून एकनाथ शिंदेंसह आमचा डीएनए एकच''
''पंडीत नथुराम गोडसेच्या विचारांसाठी आनंद दिघे कोर्टात लढले, म्हणून एकनाथ शिंदेंसह आमचा डीएनए एकच''
RBL Bank : मुंबईतील आरबीएल बँकेची विक्री होणार, दुबईतील समूह 26853 कोटी रुपयांची गुंतवणूक, 60 टक्के भागीदारी खरेदी करणार
आरबीएल बँकेची मालकी दुबईच्या कंपनीकडे जाणार, 26853 कोटी रुपयांची डील, 60 टक्के भागीदारी घेणार
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
Embed widget