एक्स्प्लोर

Ahmednagar Manmad Highway : कोपरगाव नगर मनमाड महामार्गावर अवजड वाहनांना आजपासून वीस दिवस 'नो एन्ट्री'

Ahmednagar Manmad Highway : मनमाडकडून येणारी वाहतूक वैजापूरमार्गे तर अहमदनगरहून शिर्डीकडे येणारी वाहने आळेफाटा मार्गे वळवण्यात आली आहे.

अहमदनगर : अहमदनगर मनमाड महामार्गावर (Ahmednagar Manmad Highway) आजपासून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. गेली अनेक वर्षांपासून खड्यात हरवलेला अहमदनगर मनमाड महामार्गाची दुरूस्तीचे  काम आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे पुढील वीस दिवस अवजड वाहनांची वाहतूक अन्य रस्त्यांनी वळविण्यात येणार आहे. 

मनमाडकडून येणारी वाहतूक वैजापूरमार्गे तर अहमदनगरहून शिर्डीकडे येणारी वाहने आळेफाटा मार्गे वळवण्यात आली आहे. पुढील वीस दिवस या महामार्गावर कोपरगावच्या पुणतांबा चौफुली ते नगर जवळील विळदपर्यंत जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Ahmednagar Manmad Highway : कोपरगाव नगर मनमाड महामार्गावर अवजड वाहनांना आजपासून वीस दिवस 'नो एन्ट्री

 गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता वर्ग होऊनही या महामार्गाची टेंडर प्रक्रिया रखडलीय तर काही महिन्यांपूर्वी ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. नव्याने रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी तात्पुरती डागडुजी करण्यासाठी नगर मनमाड महामार्गावरून सुरू असलेली जड वाहतूक पुढील विस दिवसांसाठी इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.दरम्यानच्या काळात महामार्गावर असणारे खड्डे बुजवण्याचं काम केलं जाणार आहे.

पुणे, सोलापूर, उस्मानाबादकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक अहमदनगर येथून आळेफाटा मार्गे वळवण्यात आली. तर धुळे, जळगावकडून येणारी जड वाहने वैजापूर मार्गे अहमदनगरकडे वळवण्यात आली आहे. पुढील वीस दिवस केवळ हलक्या वाहनांनाच नगर ते कोपरगावपर्यंत प्रवास करता येणार आहे.

नितीन गडकरी यांना पत्र

मृत्यूचा सापळा बनलेल्या नगर-मनमाड महामार्गावर महाकाय खड्डे पडल्याने साईभक्तांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पेशाने वकिली करणारे तीन पोळ यांनी चक्क महामार्गावर असलेल्या खड्ड्यात बसून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलंय. नगर मनमाड महामार्गावरून प्रवास करण्याची विनंती या पत्राच्या माध्यमातून गडकरी यांना करण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Embed widget