एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ahmednagar News : अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची पिकअपला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Ahmednagar News : अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar-Pune Highway) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

अहमदनगर : अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar-Pune Highway) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात ट्रॅव्हल्सने पिकअप (Travels Pickup Accident) वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर पिकअप वाहनातील अकरा जण जखमी झाले आहेत. जखमींवर अहमदनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तर या घटनेने ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

अहमदनगर-पुणे मार्गावर (Ahmednagar Accident) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यात ट्रॅव्हल्सने पिकअप वाहनाला धडक दिली. यात दोन पुरुष व एक महिला यांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर पिकअपमधील 11 जण जखमी झाले. दरम्यान या अपघातात प्रवीण गोरख कागदे, सारिका मच्छिंद्र कागदे, दीपक चव्हाण अशी मृतांची नावे आहेत. तर सुरज बजरंग कागदे, पिकअप चालक बजरंग शेषराव कागदे, धीरज मच्छिंद्र कागदे, मच्छिंद्र शेषराव कागदे, राहुल गोरख कागदे, सीता बजरंग कागदे, आरुषी मच्छिंद्र कागदे, आरती प्रवीण कागदे, आरती बजरंग कागदे, श्रुती मच्छिंद्र कागदे, धीरज राजाभाऊ जोगदंड अशी जखमींची नावे आहेत. काही जखमी हे बीड जिल्ह्यातील असून काही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या माहितीतून समोर आले आहे. या घटनेत एकाच कुटुंबाबतील तिघेजण मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

शनिवारी पहाटे पुणे (Pune) येथून पिकअप अहमदनगरकडे येत असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅव्हल्सने या पिकअपला जोरदार धडक दिली. यात पिकअपमधील तिघेजण जागीच ठार झाले तर 11 जण जखमी झाले. जखमींमध्ये पिकअप चालक व ट्रॅव्हल्स चालकाचाही समावेश आहे. आहे. याप्रकरणी दोन्ही वाहने अहमदनगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दरम्यान पिकअप वाहनातुन संपूर्ण कागदे कुटुंब पुण्याहून नगरकडे येत होते. अपघात झाल्यानंतर पिकअपमधील संपूर्ण कागदे कुटुंब जखमी झाले तर याच कुटुंबातील प्रवीण गोरख कागदे व सारिका मच्छिंद्र कागदे हे गतप्राण झाले. त्यामुळे ऐन दिवाळीत (Diwali) कागदे कुटुंबावर शोककळा पसरली.

कंटेनर व दोन दुचाकी अपघात

मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा व खंडाळादरम्यान असलेल्या एका हॉटेलसमोरील वळणावर एक भरधाव वेगातील कंटेनर उलटला. त्याची धडक दोन दुचाकींना बसली. त्यात एका लहान मुलींसह दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीनजण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सविता गणेश लायगुडे, लता नागेश ढुमणे, सात वर्षीय ओवी नागेश ढुमणे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून गणेश लायगुडे, नागेश ढोमणे व एक लहान मुलगा या अपघातात जखमी झाले आहेत.

इतर महत्वाची बातमी : 

Ahmednagar News : जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याचा जीव घेतला, लाखोंचा कापूसही पळवला, अहमदनगर जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Embed widget