एक्स्प्लोर

Ahmednagar News : पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावरही घेऊन जा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा 'सल्ला'

Ahmednagar News : चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकारांसंदर्भांत केलेल्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. याबाबतची ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून तत्पूर्वी त्यांनी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकले. बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी (BJP) सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे. याच बैठकीत त्यांनी पत्रकारांना (Journalist) चहा प्यायला घेऊन जा, अशा प्रकारचे वक्तव्य केलं आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप समोर आली असून माध्यमांना बैठकीला परवानगी नसल्याने व्हिडीओ उपलब्ध होऊ शकला नाही, मात्र या ऑडिओ क्लिपमुळे पत्रकारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हणाले?

बावनकुळे यावेळी म्हणाले की, ज्या बुथवर तुम्ही काम कराल, तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले (Electronic Media) कोण आहेत, पोर्टल वाले कोण आहेत, प्रिंट मीडियावाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा, आपल्या बुथवर निगेटिव्हिटी होऊ द्यायची नाही, आपल्याविरुद्ध लिहू नये, विरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या, यात एक-दोन पोर्टल वाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे समजलं असेल, त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच, अशी इशारा वजा सूचना देखील पदाधिकाऱ्यांना दिली. मिशन महाविजय 2024 पर्यंत बुथ संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत याची काळजी घ्या, असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी संवाद बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला.

बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर 

दरम्यान अहमदनगर येथील दौऱ्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर येत असून मिशन महाविजयच्या माध्यमातून घर घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. सकाळी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे तीन विधानसभा अंतर्गत तीनशे प्रमुख बुथ वॉरिअर्सची एकत्रितपणे बैठक होणार असून त्यानंतर घर घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे.  दुपारी नाशिक शहरातील सिडको भागातील कामगार मेळाव्यात उपस्थित राहून कामगारांना संवाद साधणार आहेत. तर दुपारी साडेतीन वाजता गंगापूर रोड येथे तीन विधानसभेतील प्रत्येकी 100 याप्रमाणे 300 बुथ वॉरियर्सच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सातपूर भागात घर घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. तर सायंकाळी सहा वाजे दरम्यान पंचवटी परिसरातील नाशिक पूर्व विधानसभेतील परिसरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे दौऱ्यात नमूद करण्यात आले आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Ahmednagar News : मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ देतील, तेव्हा महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget