Breaking News : अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी नाही
Ahmednagar Railway Fire : रेल्वेच्या दोन डब्यांना ही आग लागली असून त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
अहमदनगर: आष्टी रेल्वेला भीषण आग (Ahmednagar Railway Fire) लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे. आग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे.
नगरमधील शिराडोह परिसरातील रेल्वेला ही आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. ही आग लागताच सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आलं, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र ही आग इतकी भीषण होती की त्यामध्ये रेल्वेचे मोठं नुकसान झालं आहे. सध्यातरी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी यद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची चौकशी करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या ठिकाणी आता अग्निशमन दल पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या रेल्वेमधील प्रवासी हे बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या गाडीला प्रवाशांचा तेवढा प्रतिसाद नसल्याने गोंधळही झाला नाही.
रेल्वेच्या दोन डब्यांना लागलेली ही आग सध्या पसरत असल्याचं चित्र आहे. पण रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आष्टी -अहमदनगर ही रेल्वेगाडी अहमदनगरकडे जातांना नारायण डोहच्या पुढे असलेल्या नगर सोलापूर हायवे वरील गेट जवळ अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली.
गेल्या वर्ष भरापासून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अहमदनगर-आष्टी पर्यंत काम पूर्ण झाले असून, अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेसेवा 23 सप्टेंबर 2022 पासून नियमित सुरू झाली आहे. ही रेल्वे अहमदनगर वरून सकाळी 7.45 वाजता निघते आणि न्यू आष्टी येथे 10.15 वाजता पोहोचते. त्यानंतर न्यू आष्टी वरून 11 वा.निघून दुपारी 2 वा. अहमदनगर येथे पोहचते. परंतु आज सोमवारी अहमदनगर येथूनच सकाळी 10.30 वा गाडी सुटल्याने रूटींग प्रमाणे न येता रेल्वे लेट झाली. ही रेल्वे पुन्हा आष्टी येथून अहमदनगर येथेजात असताना दुपारी ३.३० वा.नारायण डोहच्या पुढे गेल्यानंतर अहमदनगर-सोलापूर मार्गावरील गेट क्रॉस करताना अचानक पुढील चार-पाच बोगीला आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली असून, रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अहमदनगर महापालिका कर्मचारी आणि नागरिकांनी प्रयत्न करून आटोक्यात आणली आहे.
एकही टिकीट विक्री नाही
सोमवार ते शनिवार नियमित अहमदनगर ते न्यू आष्टी रेल्वे सेवा सुरूळीत सुरू आहे. परंतु दर रविवारी ही डेमो पुणे येथे साफसफाई आणि डिझेल भरण्यासाठी जाते. त्यामुळे सोमवारी ही रेल्वे वेळेवर न येता उशीरा येते. त्यामुळे आज न्यू आष्टी, कडा, न्यू धानोरा, सोलापूरवाडी, न्यू लोणी व नारायणडोह या रेल्वे स्टेशनवरून एकही तिकीट विक्री झाली नाही.
ही बातमी वाचा: